Vegetable Price Hike Saaam Tv
महाराष्ट्र

Vegetable Price Hike : मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले; टोमॅटोचा भाव १०० रुपये किलो, वांगीही महागली

Tomato Price Increases: सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहे. टॉमेटो प्रति किलो १०० रुपये किलो विकले जात आहे. यामुळे सर्वसामन्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसली आहे.

राजेश काटकर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र आनंद झाला आहे. परभणी बाजारपेठेत टॉमेटोचे भाव प्रति किलो ८० ते १०० रुपयांना विकले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसला आहे.

टॉमेटोच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या घरात टॉमेटो हा वापरलाच जातो. टॉमेटोचे भाव वाढल्याने गोरगरीब ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसत आहे. त्यामुळे टॉमेटो खरेदी करावा की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे.

टॉमेटोसोबतच इतर अनेक पालेभाज्यांचे दर वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्यांचे दर वाढले असले तरीही त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होच नसल्याचे दिसत आहे. दलाल आणि विक्रेत्यांना या भाववाढीचा फायदा होत आहे.

भाजीपाल्यांचे दर

बाजारात मिरची ८० रुपये प्रति किलो विकली जात आहे. तर वांगी ७० आणि दोडके ५० रुपयांना विकले जात आहे. पालक-शेपू २५ रुपये प्रति जुडी विकली जात आहे. गवार ७० रुपये किलो तर भेंडी ६० रुपये प्रति किलो विकली जात आहे. बटाटा ७० रुपये किलो तर काकडी ६० रुपये प्रति किलो विकले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

Accident News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! रस्ता ओलांडताना ट्रेलरने उडवले, आईच्या डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू; भंडाऱ्यावर शोककळा

SCROLL FOR NEXT