Toll Free Saam Tv
महाराष्ट्र

Toll Free: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर 'या' वाहनांना टोलमाफी; वाचा सविस्तर

Toll Free For Electric Vehicles: राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने मुंबई-पुणे द्रुतगती महागाई, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवरील ई-वाहनांना टोलमाफी असणार आहे.

Siddhi Hande

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई-पुणे द्रुतगती महागाई, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर ई-वाहनांना टोलमाफी

पुणेकरांना सर्वाधिक फायदा

महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई-पुणे द्रुतगती महागाई, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवरील काही वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. ईलेक्ट्रिक वाहनांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. ई-वाहनांना या एक्सप्रेस वे आणि हायवेवरील ई वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. या निर्णयामुळे ई- वाहन असणाऱ्यांना फायदा होणार आहे.

पुणेकरांना सर्वाधिक फायदा

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरातील वाहचालकांना विशेष फायदा होणार आहे. ई-वाहनधारकांना हा फायदा होणार आहे.

राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर केले. यामुळे ई-वाहनांना चालना मिळाली. याआधीदेखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारने योजना सुरु केली होती. राज्य सरकारच्या या इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीच्य निर्णयाचा पुण्याला खूप फायदा झाला आहे. पुण्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

पुण्यात ई-वाहनांची संख्या ही १ लाखांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ई वाहनांवरील सवलत कमी केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यात ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये घट झाली. त्यामुळेच राज्य सरकारने ई-वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील या वाहनांना टोलमाफी

इलेक्ट्रिक चारचाकी वाहने (M2, M3, M6 श्रेणीतील), इलेक्ट्रिक बसेस -राज्य परिवहन उपक्रम ( STU ) तसेच खासगी इलेक्ट्रिक बसेस (M3, M6) प्रकारातील वाहनांना टोल माफी आहे.ही सूट २२ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री पासून लागू झाली आहे.

या महामार्गांवर टोलमाफी (Toll Free on Samruddhi Mahamarg, Mumbai Pune Expressway And Atal Setu)

राज्य सरकारने आदेश काढला आहे. या आदेशानुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, अटल सेतू महामार्ग या मार्गांवर टोल भरण्याची गरज नाही. ई वाहन वापरामुळे इंधन खर्च वाचणार आहे. यामुळे प्रदुषणदेखील होणार नाही. त्यात हा टोलमाफीचा निर्णय घेतल्यामुळे ई-वाहन असणाऱ्यांना अधिकच फायदा होणार आहे. या निर्णयाच्या अंबलबजावणीसाठी महामार्ग प्राधिकरणांना सूचना देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीकडे असलेल्या 'या' ७ महागड्या गोष्टी; किंमत ऐकून व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: नगर- मनमाड महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू

Panipuri Pani Recipe: पाणीपुरीचं आंबट-गोड पाणी बनवण्याची सीक्रेट रेसिपी; आजच करा ट्राय

Thursday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, दवाखाने मागे लागतील; 5 राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष खबरदारी

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

SCROLL FOR NEXT