Gav khedyatil batmya  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Gav khedyatil batmya : नाशिकमध्ये चड्डी-बनियान गँगचा धुमाकूळ ते गावकऱ्यांनी शाळेलाच ठोकलं कुलूप, वाचा गाव-खेड्यातील महत्वाच्या बातम्या

Namdeo Kumbhar
Gavkhedyatil Batmya In Marathi

Nashik Crime : नाशिकमध्ये चड्डी-बनियान गँगचा धुमाकूळ

नाशिकच्या मालेगावमध्ये चड्डी-बनियन गँगने धुमाकुळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी या गँगने कॉलनी भागातील एका घरात घरफोडी करुन सोनं व रोख रक्कम लंपास केली होती. या गँगने मालेगाव-मनमाड चौफुलीवरील सहा दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. चोरट्यांची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या चड्डी-बनियन गँगला शोध घेण्याचे मोठ आवाहन पोलिसांसमोर आहे. .

Amravati : देशसेवा करून परत आलेल्या जवानांचे जंगी स्वागत

अमरावती : तब्बल 32 वर्षे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर दिवस-रात्र पहारा देत देशसेवा करणाऱ्या जवानाचं सेवानिवृत्त झाल्यानंतर गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नांदरून येथील जवान बाळकृष्ण वानखडे यांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या सैन्य दलात तब्बल 32 वर्ष बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर देशसेवा केली. या 32 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या गावी परतले, यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आतापर्यंत बॉर्डर हेच आमचे गाव होते केवळ आपल्या गावात पाहुण्यांप्रमाणे एक दोन महिन्यासाठी येत होतो मात्र गावकऱ्यांनी केलेल्या या स्वागतामुळे आपण भारावून गेल्याचे बाळकृष्ण वानखडे यांनी सांगितले.

Pune News पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, पुण्यात ट्रफिक होणार

पुण्यातील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी खरेदीला येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

Pune Crime : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, आरोपीकडून 21 दुचाकी हस्तगत

मावळमध्ये मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 21 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. देहूरोड पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. आकाश शंकर जाधव आणि आशुतोष नानासाहेब घोडके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. काहीजण चोरीची दुचाकी घेऊन देहूरोड बाजार परिसरात येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली, त्यानुसार सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून एकूण 14 लाख 45 हजारांच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे विविध पोलीस ठाण्यातील 20 गुन्हे उघडकीस आले आहे.

बुलढाण्यात शाळेला शिक्षक नसल्याने ग्रामस्थ आक्रमक

संग्रामपूर तालुक्यातील ग्राम खळद येथे कित्येक वर्षापासून एकच शिक्षक 1 ते 5 पर्यंत वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्याचे समोर आहे आहे. एक शिक्षक व वर्ग पाच वारंवार जिल्हापरिषदेकडे तक्रारी केल्या मात्र काहीही फायदा झाला नाही शेवटी ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकले असून जोपर्यंत जास्त शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडल्या जाणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अशी परिस्थिती संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात आहे. त्यामुळे तालुक्यात शिक्षणाचा बट्ट्याबोल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

बारामतीमध्येच लाडक्या बहीण योजनेच्या बॅनरवरुन अजित पवार गायब

बारामतीत लाडक्या बहिण योजनेच्या संदर्भात" देवेंद्र भाजप समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. अजित पवारांच लाडक्या बहीण योजनेचं श्रेय हाणून पाडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची फडवणीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. "देवा भाऊ" लाडक्या बहिणीला मिळणार १५०० रुपये महिन्याला' बॅनर वरती टॅगलाइन आहे. यावेळी देवेंद्र फडवणीस समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जाणीवपूर्वक टाळण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. मात्र अजित पवारांचा फोटो वगळण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : 50 हून अधिक अतिक्रमणांवर हातोडा

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यावर मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. मात्र याबाबत अनेक वेळा मागणी करूनदेखील महापालिकेकडून दुर्लक्ष केले जाते होते. यामुळे शहरात कायम वाहतूक कोंडी निर्माण होत होती आणि वाहणे काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. गणेशोत्सवामध्ये शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढावे,अशी शांतता समितीच्या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. अखेर लोकप्रतिनिधींच्या दट्ट्यानंतर मनपा प्रशासनाला आखेर जाग आली. बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी महापालिका मुख्यालय ते चंपा चौक रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेत तब्बल ५० पेक्षा अधिक अतिक्रमणे महानगरपालिकेने जमीनदोस्त केली असून रस्ता रुंदीकरण करण सुरू झालंय.

कल्याणमध्ये सुरू होणार केडीएमसीचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

कल्याणमध्ये केडीएमसीचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच नागरिकांच्या सेवेत असणार आहे. कल्याण पश्चिमेकडील गौरी पाडा परिसरात आरक्षित भूखंडावर रुग्णलयाची तीन मजली इमारत बांधून पूर्ण झाली आहे. या इमारतीचे आज आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी रुग्णालय सुरू करण्याची तांत्रिक कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. लवकरच या ठिकाणी नागरिकांसाठी 100 बेडचे सुसज्ज असं सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू होणार असल्याचे सांगितले.

घरगुती गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोट, एकाचा मृत्यू

अहमदनगर : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे 15 दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडर लिकेज होऊन झालेल्या स्फोटात 9 जण जखमी झाले होते. जखमींवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र यातील सुरेश भाऊसाहेब वायकर या तरुणाचा काल उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय.या घटनेने एकरुखे गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत 9 जणांसह गोठ्यातील जनावरे देखील भाजली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT