Gav khedyatil batmya  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Gav khedyatil batmya : सोलापुरात रेल्वे घातपाताचा डाव, भंडाऱ्यात शाळांना सुट्टी, वाचा गाव-खेड्यातील महत्वाच्या बातम्या

Namdeo Kumbhar

इगतपुरीच्या शाळेत सहा वर्गाला एकच शिक्षक

इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो येथील जिल्हा परिषद शाळेला सहा वर्गाला एकच शिक्षक आहे. वारंवार सांगूनही शिक्षक भेटत नसल्याने पालकांनी शाळेला टाळे ठोकले होते. येथील शालेय विद्यार्थी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या भेटीला निघाले आहेत. शिक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं विद्यार्थ्यांची घोषणाबाजी करत मुंबईच्या दिशेने कूच करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विषय ऐकून शिक्षण विभागाची झोप उडाली. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी पोहचले इगतपुरी रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांच्या भेटीला आले.

पुण्याला मिळाली वंदे भारत -

आता पुण्यातूनही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुणे ते हुबळी या मार्गावर वंदे भारत धावणार आहे. 15 सप्टेंबर पासून एक्सप्रेस धावणार आहे. त्यामुळे आता पुणे ते सांगली असा प्रवास तीन तास 55 मिनिटांमध्येच होणार आहे. राज्यात लवकर विधानसभा निवडणुका असल्यामुळे काही शहरात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत.

एमआयडीसीमध्ये फटका कंपनीला आग

नाशिक-पुणे रोडवर शिंदे एमआयडीसीमध्ये फटका बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आग कशामुळे लागली ते अद्याप अस्पष्ट आहे. पण परिसरात भितीचे वातावरण आहे. एमआयडीसीमध्ये अनेक कर्मचारी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आणि अग्निशामन दलाला याबाबत कळवण्यात आलेय. मदतकार्य सुरु करण्यात आल्याचं समजतेय.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचा रस्ता रोको

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपयाची मदत द्या, तसेच सोयाबीनला प्रति प्रतिक्विंटल 8 हजार रुपयांचा भाव द्या , या मागण्यांसाठी आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करँण्यात आले. मनसेच्या आंदोलनामुळे लातूर-बार्शी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान मागण्या मान्य नाही झाल्यास यापेक्षाही , तीव्र आंदोलन करु, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड देखील करण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

अडीच कोटी रुपयांच्या "प्रकृती" नावाच्या चित्राची चोरी

सुप्रसिद्ध चित्रकार एस एच रझा यांच्या चित्राची ऑक्शन हाऊस मधून चोरी झाली आहे. १९९२ साली काढलेल्या "प्रकृती" नावाच्या चित्राची चोरी झाली आहे. या चित्राची किंमत अडीच कोटी रुपयांच्या घरात असल्याचं समोर आलेय. एम आर ए मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञातविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बॅलार्ड पिअर येथील ऑक्शन हाऊस मधून चोरी झाली.

कर्जतमधील तिहेरी हत्याकांड प्रकरण

रायगडच्या कर्जत तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाचा तपास लावण्याकामी रायगड पोलिसांना यश आले असून सख्ख्या भावानेच मालमत्तेच्या वादातुन आपल्या भावाचे आख्खे कुटूंब संपवल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मदन पाटील व त्याची सात महिन्याची गरोदर पानी अनीशा आणि मुलगा विवेक यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी मदन पाटील याचा भाऊ हनुमंत पाटील याला पोलिसांनी अटक केली असून हनुमंत पाटील याने चौकशीत विसंगत उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.

गावातील वडीलोपार्जित घर मदन याच्या नावावर होते तसेच दोघांचे रेशनकार्ड देखील एकच होते. त्याचा लाभ हनुमंत याच्या कुटुंबाला मिळत नव्हता. हनुमंत, मदन याच्याकडे वेगळे रेशनकार्ड आणि घराचा हिस्सा मिळावा यासाठी तगादा लावत होता. परंतु मदन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे हनुमंतच्या मनात राग होता. या रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात महिनाभरात 4 जणांचा मृत्यू, गावकरी संतप्त

नंदुरबार: तळोदा तालुक्यातील बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तसेच भितीचे वातावरणही आहे. त्यामुळे बिबट्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.

तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिनाभरात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या कारभाराच्या विरोधात सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. वनविभागाच्या कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा काढला. बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबियांना तात्काळ मदत द्या, अशीही मागणी करण्यात आली आहे.

पावसाचा रेड अलर्ट, भंडारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलं आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. तर जिल्हयाची जीवनदायी समजली जाणारी वैनगंगा नदी देखील भरून वाहत आहे. पावसाची सद्यस्थिती पाहता जिल्हाधिकारी यांनी उद्या सर्व शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर केली आहे.

गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले आहे. 15 दरवाजे 1 मिटरने तर 18 दरवाजे 0.5 मिटरने उघडण्यात आली असुन नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्ह्यातील रेशनकार्डधारक आनंदच्या शिध्यापासून वंचित

आनंदाच्या शिध्यापासून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रेशनकार्डधारक वंचित आहेत. पालघर जिल्ह्यात आनंदचा शिधा वाटप केलं जाते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ग्रामीण भाग वंचित आहे. रेशन दुकानांवर कधी आनंद शिधा येणार, याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. गणेशोत्सवात रेशनिंग कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार असल्याचे सांगितले जाते, असताना मात्र ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागात अद्यापही आनंदाचा शिधा वाटप झाले नाही.

कुर्डूवाडीत रेल्वेच्या घातपाताचा प्रयत्न, गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी रेल्वे जंक्शन जवळ ७०० मीटर अंतरावर असलेल्या एका सिग्नल पॉइंटजवळील रेल्वे रुळावर मोठा दगड अज्ञाताने घातपात करण्याचा उद्देशाने ठेवला होता. परंतु एका रेल्वे गाडीच्या लोको पायलटच्या सतर्कतेमुळे सदरची घटना उघड झाली अन् मोठा अनर्थ टळल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. कुर्डूवाडी रेल्वे रूळावर दगड ठेवलेल्या त्या अज्ञाताचा शोध सुरू आहे.याबाबत सिनियर सेक्शन इंजिनिअर कुंदनकुमार यांनी येथील रेल्वे पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT