Maharashtra Weather Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Weather News: राज्यात तापमान चाळिशीपार ; विदर्भात गारपीटीची शक्यता

Vidarbha, Marathwada, Nagpur Weather Forcast: राज्यात अनेक ठिकाणी चाळीस अंशांचा तापमानाचा पारा ओलांडला आहे. तर विदर्भात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Rohini Gudaghe

Todays Maharashtra Weather Update

राज्यात तापमानाचा पारा सातत्याने (Maharashtra Weather) वर चढत आहे. आज तापमानात कमाल वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशांच्या वर जात आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. २५ मार्च रोजी मालेगाव येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.  (Latest Weather Update)

मालेगावमध्ये सोमवारी ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. मालेगावसह अकोला, यवतमाळ, सोलापूर आणि ब्रह्मपुरी येथे तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. (Maharashtra Weather Forecast Update) तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. परंतु राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तिवली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तेथे गडगडाटी वादळासह गारपीट होण्याचा दाट अंदाज वर्तविला जात आहे. अवकाळी पुन्हा एकदा हजेरी लावणार (Maharashtra Weather Forecast) असल्याचं चित्र आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेच्या लाटांपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)

राज्यात तापमान चाळीसीपार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहे. पुढील 24 तासांत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, सिक्कीम, पूर्व झारखंड, छत्तीसगड पूर्व विदर्भ, ( Summer Heat Wave) आणि अरुणाचल प्रदेशांमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ, जोरदार वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.

पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात 26 मार्च ते 29 मार्चदरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. 8 आणि 29 मार्च दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता (Rainfall) आहे. छत्तीसगड, पूर्व झारखंड, पश्चिम बंगाल, पश्चिम आणि उत्तर ओडिशा येथे देखील गडगडासह अवकाळीची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT