Maharashtra Weather Forecast
Maharashtra Weather ForecastSaam TV

Weather Forecast: विदर्भ-मराठवाड्यात आजही तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Weather Update Today: विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात आज गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Published on

Maharashtra Rain Alert

मार्च महिना संपत आला तरी अवकाळी पावसाचं संकट काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील अवकाळीने चांगलाच तडाखा दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Weather Forecast
Bhiwandi Fire News: भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; अनेक वाहने जळून खाक, परिसरात धुराचे लोट

ज्यामुळे फळबागा तसेच रबी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचं हे संकट कधी दूर होईल, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. (Breaking Marathi News)

आजपासून पुढील तीन ते चार दिवस छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे.

मध्य भारत आणि पूर्व भारतात अवकाळी पावसाचा जोर (Rain Alert) वाढू शकतो. त्याचबरोबर महाराष्ट्रावरही पुढील काही दिवस अवकाळीचं संकट कायम राहणार असून विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात आज गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे मुंबई पुण्यातील तापमानात किंचित घट होऊन रात्री थंडी पडण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर भागातील हवामान कोरडे राहणार, अशी माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे.

Maharashtra Weather Forecast
Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य, २० मार्च २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काय घेऊन आलाय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com