Maharashtra News  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon : गणरायांच्या आगमनाला वरुणराजाची हजेरी, राज्यात जोरदार पावसाची शक्यता, वाचा IMD चा आजचा अंदाज

Maharashtra News : महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Alisha Khedekar

  • गणेशोत्सवावर पावसाचं सावट.

  • महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा सक्रिय, कोकण-घाटमाथा-विदर्भात पावसाचा जोर.

  • साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट.

  • प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा.

महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भ या भागांत पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिक यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत परभणी आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यावरून राज्यात पावसासोबतच उकाड्याचे प्रमाणही जाणवत असल्याचे स्पष्ट होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे मॉन्सूनला पुन्हा बळ मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार सरी सुरू झाल्या असून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत देखील पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता असून, या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत तुरळक पावसाबरोबर विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कायम राहतील.

हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मॉन्सूनला पुन्हा एकदा जोर मिळालेला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : वर्ल्डकप जिंकूच शकत नाही! टीम इंडियाच्या निवडीवर महान खेळाडू भडकला

Google Translate New Feature: गुगल ट्रान्सलेटने आणलं धमाकेदार फीचर, अनेक भाषा शिकता येणार

Nagpur News: शेतात काम करताना वीज कोसळली; मायलेकासह तिघांचा मृत्यू

Manoj Jarange: जुन्नरमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष; दोन लाख आंदोलकांसाठी ‘मायेचा घास’ भाकरी-चटणीची मेजवानी|VIDEO

Bhogwe Beach : गणपतीला कोकणात गेलाय, भोगवे समुद्र किनाऱ्यावर मारा फेरफटका

SCROLL FOR NEXT