Today Maharashtra Weather Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Weather : शेकोट्या विझणार, उकाडा वाढणार? राज्यातील तापमानात वाढ; वाचा तुमच्या शहरातील आजचं हवामान

Today Maharashtra Weather News : राज्यात हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत असून किमान तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यांचा शेतकरी व मच्छिमारांना फटका बसत आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात हवामानात सातत्याने चढ-उतार

  • किमान तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता

  • अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान

  • जोरदार वाऱ्यांमुळे मच्छिमार अडचणीत

  • हवामान बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

राज्यातील वातावरणात चढ उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून थंडी गायब असून ठिकठिकाणी पावसासारखे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान मंगळवारी राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. काल म्हणजेच गुरुवारी देखील सकाळच्या सुमारास तुरळक ठिकाणी गारपीट झाली. आज राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तापमानात होणारा सततच्या बदलावामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.

आज राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी नाहीशी होऊन उकाडा वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमानात होणाऱ्या सततच्या बदलावामुळे मच्छिमारांना आणि शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

पौर्णिमेच्या चांदण्यामुळे मासे स्थलांतरित झाल्यामुळे मच्छिमारांना जाळ्यात मासेच सापडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर आता गेले काही दिवस समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने पुन्हा मच्छीमार अडचणीत आले आहेत.

तसेच मंगळवारी पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे नुकसान केले आहे.या नुकसानाची भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. शिवाय थंडी, पाऊस आणि उन्हाच्या या लपंडावात मात्र नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोर जावं लागत आहे.

ढगाळ वातावरणामुळे कांदा बियाणे उत्पादक शेतकरी अडचणीत

बुलढाणा जिल्ह्यातील कांदा बियाणे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. याचा थेट परिणाम बियाणे उत्पादनावर होत असून कांदा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणी कांदा पीक पिवळे पडले आहे तर काही ठिकाणी कांद्याची वाढ थांबली आहे . परिणामी महागडा कांदा लागवड करून आणि त्यावर खर्च करून शेतकऱ्यांना हातात काहीच येणार नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Health Care : दररोज सकाळी तुळशीचा काढा पिण्याचे फायदे, जाणून घ्या

Actress Fraud Case: प्रसिद्ध अभिनेत्रीवर ११.५ कोटींच्या फसवणुकीचा आरोप; मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Morning Foods: सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये?

Akola Mayor: अकोल्याला आज महापौर मिळणार, कोण बसणार खुर्चीवर? भाजप सत्ता कायम राखणार का?

SCROLL FOR NEXT