Today Live Batmya in Marathi (7 March 2024) | Latest Update on mahayuti mahavikas agahdi Loksabha Election 2024, uddhav thackeray in dhahashiv and Overall Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Today's Marathi News Live: अकोला पोलीस दलात 34 दुचाकी वाहन दामिणी पथकात दाखल

Maharashtra Latest News and Update in Marathi (7 March 2024) : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.

प्रविण वाकचौरे

अकोला पोलीस दलात 34 दुचाकी वाहन दामिणी पथकात दाखल

अकोला पोलीस दलात दामिनी पथकाचा मोठा विस्तार झालाय. आता 34 दुचाकी वाहन दामिणी पथकात दाखल झाले आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांना टारगटांचा होणारा त्रास रोखण्यासाठी अशा स्थितीत अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून नविन विस्तार झाला आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर चांदवड काँग्रेस पदधिकाऱ्यांची बैठक संपन्न

लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले असल्याचे चित्र स्पष्ट होत असून या संदर्भात खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा जागो जागी होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल कांदा, द्राक्ष, ऊस, सोयाबीन मका या संदर्भात विशेष चर्चा करत आहेत. त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका येथे आज त्या बैठक पार पडली. राहुल गांधी यांचा भव्य दिव्य असा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मेळावा होणार आहे.

कल्याण ग्रामीणमधील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट

कल्याण ग्रामीण मधील 14 गावे आता नवी मुंबई महापालिकेत अखेर समाविष्ट होणार आहेत. राज्य सरकारने आज याबाबतचा अंतिम जीआर काढलाय. मागील वर्षीच्या अधिवेशनात मनसे आमदार राजू पाटील यांनी 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याविषयीचा मुद्दा लक्षवेधीमध्ये उपस्थित केला होता.

विविध मागण्यांसाठी कामगार संघर्ष समितीचा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वाशिम जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीकडून वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात यावं,ग्रामीण भागातील अस्थाई नाका कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, मंडळाकडे नोंदणीसाठी प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ निकाली काढण्यात यावे, नूतनीकरण प्रलंबित असलेल्या मजुरांचे तात्काळ नूतनीकरण करण्यात यावं, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

मंत्री दानवे यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या ताफयाला काळे झेंडे दाखवण्यासाठी जाणाऱ्या अजय साळुंखेंसह मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.शिऊर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीय. दानवे आज वैजापूर,बीड जिल्ह्यात रेल्वेच्या विविध विकासकामाच्या बैठकीला जातं असताना ही घटना घडलीय. दानवे यांचा ताफा अडून काळे झेडे दाखवयाच्या तयारीत असताना वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना शिऊर ठाण्यात घेऊन गेल्याची माहिती आहे.

शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांचा जमीन अर्ज फेटाळला

रेणुका सूत गिरणीसाठी घेलेल्या कर्जातून जिल्हा बँकेची फसवणू केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मालेगाव अप्पर सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होऊन त्यांना जमीन मिळाला मात्र त्यावेळी न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी जय शिवराय किसान संघटनेची सर्वोच्च न्यायालयात धाव

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी जय शिवराय किसान संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उसाच्या एफआरपीचा बेस चार वेळा बदलल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रति टन १६०० रुपयांचं नुकसान झाला आहे. त्यामुळे मूळ रिकवरी बेस हा ८.५० % हाच धरावा यासाठी जय शिवराय किसान संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण: आरोपींना जामीन मंजूर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना वांद्रे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत तसेच अटक आरोपी किंचन नवले यांना देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हदगाव तालुक्यातील ८ ते १० खेड्यामधील नागरिकांना विषबाधा

देड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील दहा ते बारा गावातील नागरिकांना भगरातून विषबाधा झाली. जवळ पास ६० ते ७० जणांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन फेटाळला

शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन फेटाळला

आज होती मालेगाव न्यायालयात सुनावणी

रेणुका सूत गिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरण

⁠गेल्या तीन महिन्यांपासून अद्वय हिरे आहेत कारागृहात

रेणुका सूत गिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या जामिनावर आज मालेगाव अपर सत्र न्यायालयात अद्वय हिरे यांच्या जामीनावर होता निकाल

काल दिवसभर सुनावणी झाल्यांनतर न्यायलयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत राखीव ठेवण्यात आला होता जामिनावर निकाल

मात्र आज त्यांचा जमीन अर्ज कोर्टाने फेटाळला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण, आरोपी किंचन नवलेला जमीन मंजूर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण

आरोपी किंचन नवलेला जमीन मंजूर

वांद्रे कोर्टाने केला जमीन मंजूर

दुसऱ्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केलं असता जमीन मंजूर

याच प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना देखील झाली होती अटक

कोल्हापूर : फोंडा ते दाजीपूर मार्गावर 18 चाकी कंटेनर रस्त्यामध्ये उलटला

कोल्हापूर : फोंडा ते दाजीपूर मार्गावर 18 चाकी कंटेनर रस्त्यामध्ये उलटला

फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद

फोंडा घाटात वाहनांच्या रांगा

घटनास्थळी पोलिस विभाग व इतर संबंधित यंत्रणा पोहोचली

कंटेनर बाजूला घेण्याची कार्यवाही सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासु , सुधाकर शिंदे हे यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

काल मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढल्याबद्दल गुन्हा दाखल

आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वर्षा गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राखी जाधव आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

एकूण ६०-७० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

विना परवाना मोर्चा काढणे, जमावबंदी आदेशाच उल्लघन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेस तडा जाईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नवी दिल्ली : निवडणूक रोखेबाबत सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल

नवी दिल्ली : निवडणूक रोखेबाबत सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल

ADR कडून दाखल करण्यात आली अवमान याचिका

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर देखील SBI ने निवडणूक रोख्यांची माहिती न दिल्याने याचिका दखल

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

आज सायंकाळी होणार नाशकात दाखल

उद्या महाशिवरात्रीला नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात घेणार श्रीरामाचे दर्शन आणि करणार आरती

शहरातील विविध शाखांचे करणार उद्घाटन तसेच देणार भेटी

उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार राज्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक

तर ९ तारखेला नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात साजरा होणार मनसेचा १८ वा वर्धापन दिन

या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने राज ठाकरे राज्यातील पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित

आगामी लोकसभेचं रणशिंग राज ठाकरे नाशिकमधून फुंकणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार पुणे विमानतळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार पुणे विमानतळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी १० मार्च रोजी करणार उद्घाटन

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त अखेल मिळाला

पुणे मेट्रो मेट्रोच्या विस्तारीत मार्गाच्या नंतर पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच ही होणार उद्घाटन

उद्घाटन कार्यक्रमानंतर ४ ते ६ आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नवीन टर्मिनलवरून विमान उड्डाण सुरु होणार

पंतप्रधान मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनऊ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल चे उद्घाटन करणार  (Latest Political News)

आचार संहिता लागण्यापूर्वी कोस्टल रोडच्या एका मर्गिकेच उद्घाटन होण्याची शक्यता

कोस्टल रोडच्या एका मर्गिकेच उद्घाटन आचार संहिता लागण्यापूर्वी होण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअली उद्घाटन करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील

१९ फेब्रुवारीला होणार होते पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन

मात्र पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यानंतर उद्घाटन रखडलं

वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडची एक मार्गिका लवकरच होणार वाहतुकीसाठी खुली

शरद पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मिडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

सत्र न्यायालयाने सुनावलेली पाच दिवसांची पोलीस कोठडीचा निर्णय ठरवला रद्दबातल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याबद्दल झाली होती योगेश सावंत यांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT