Maharashtra Today Weather Temprature Update Saam Tv
महाराष्ट्र

Weather News : राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरूच, आज कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Today Weather News : महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर तापमानात वाढ झाली असून काही भागांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत.

Alisha Khedekar

  • राज्यात तापमानात हळूहळू वाढ होत असून उन्हाचा चटका वाढणार

  • काही भागांत विजांसह वादळी पावसाची शक्यता

  • भंडाऱ्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान

  • शेतकरी कर्जफेड आणि नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

Maharashtra Today Weather Temprature Update राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. गेले काही दिवस सुरु असलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मात्र काही भागांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असून कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

काल म्हणजेच मंगळवारी, अकोला येथे देशातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तसेच निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पाऊस, तसेच कोकणातील ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांत उष्ण लाटेचा व दमट हवामानाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

भंडाऱ्यात अवकाळीचा धुमाकूळ

भंडारा जिल्ह्यात १७ ते २३ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ७६.३० हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. एकट्या लाखनी तालुक्यातील १६ गावांमधील शेती प्रभावित झाली असून १७५ शेतकऱ्यांचे प्राथमिक नुकसान नोंदवण्यात आले आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा, पोपट, उडीद, जवस आणि लाखा-लाखोरी ही पिके पावसामुळे मातीमोल झाली आहेत. ३१ मार्च ही पीक कर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्याने, नुकसान सोसूनही शेतकरी शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी कर्ज भरण्यासाठी धावपळ करत आहेत.

शेतपिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल

ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी धान्यावर कीड आणि रोगांचे सावट आले आहे, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. नुकसानीचा हा प्राथमिक आकडा असून अंतिम सर्वेक्षणानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली आहे. आता बळीराजाला प्रतीक्षा आहे ती शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची आणि कीडनाशकांसाठी अनुदानाची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Hair Care : उन्हाळ्यात वारंवार केस धुण्याचे टेन्शन सोडा, 'हा' हेअर मिस्ट चिकट केसांना करेल चमकदार अन् सिल्की

Famous Actress Death: भीषण कार अपघातामध्ये ३० वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, अपघाताचा थरारक VIDEO समोर

Eknath Shinde: सातारा राड्यावरून शिंदेसेनेत खलबतं, रात्री उशिरा एकनाथ शिंदेंची आमदार-मंत्र्यांसोबत बैठक; नेमका काय निर्णय घेतला?

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे ५ दिवस! लाडक्या बहिणींनो आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

Maharashtra Live News Update: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत

SCROLL FOR NEXT