Chandrapur Tigar Attacked Women: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूरात (Chandrapur) सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलंय. दिवसा उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडा जाणवत असल्याने अनेकजण रात्री घराच्या छतावर किंवा घराबाहेर खाट टाकून झोपत आहेत. अशातच चंद्रपुरात अंगणात झोपलेल्या एका महिलेसोबत मध्यरात्रीच्या सुमारास भयानक घटना घडली. (Latest Marathi News)
घरात उकाडा जाणवत असल्याने महिला निश्चिंत अंगणात झोपली होती. मात्र, ही झोप या महिलेची अखेरची झोप ठरली. रात्री साखर झोपेत असताना या महिलेवर अचानक वाघाने झेप घेतली, तिला खाटेवरून उचललं आणि जंगलाच्या दिशेने धाव घेतली.
आरडाओरड झाल्याने आजूबाजूला झोपलेले इतर नागरिक जागी झाले. त्यांनी हातात काठ्या घेऊन आरडाओरड केल्याने वाघाने (Tiger) या महिलेला सोडलं आणि तो जंगलात धूम ठोकली. मात्र, या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना चंद्रपुरातील सावली तालुक्यातील विरखल चख इथं घडली. या घटनेने दहशत पसरली आहे.
मंदाबाई एकनाथ सिडाम (वय ५३) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. मंदाबाई ह्या सोमवारी रात्री घराबाहेरील अंगणात झोपल्या होत्या. दरम्यान, मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एका वाघाने झोपलेल्या मंदाबाई यांच्यावर झेप घेतली. (Breaking Marathi News)
त्यांना ओढत ओढत वाघ जंगलाच्या दिशेने नेत होता. याच दरम्यान काही गावाकऱ्यांणी हे दृश्य बघितलं. त्यांनी आरडा ओरड सुरू केली. अखेर इतर गावकऱ्यांनी धाव घेताच वाघाने त्यांना सोडून जंगलाच्या दिशेने धाव घेतली. यात मंदाबाईंचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती सावली वनपरिक्षेत्र व पाथरी पोलिसांना (Police) देण्यात आली. दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वनविभागाने मृतकाचा परिवाराला २५ हजारांची मदत केली. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत असून गावात दहशत पसरली आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.