three thousand police for bandobast on eve of Kartiki Ekadashi in Pandharpur Pandharpur News - Saam TV
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी निमित्त पंढरपुरात ३ हजार पोलीसांचा राहणार वाॅच, बंदोबस्तासाठीची ऑनलाइन प्रणाली विकसीत

Pandharpur News - कार्तिकी निमित्त 30 नाेव्हेंबरपर्यंत विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.

भारत नागणे

Pandharpur Kartiki Wari News:

कार्तिकी वारीत (kartiki wari) भाविकांच्या सुरक्षेसाठी तब्बल तीन हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची करडी नजर आता पंढरपुरात असणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पोलिसांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे बंदोबस्त तयार केला आहे. त्याबाबतची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

पंढरपुरात येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकीचा सोहळा साजरा होणार आहे. कार्तिकी यात्रेच्या (Kartiki Ekadashi 2023) निमित्ताने प्रशासनाने पंढरपूरात जय्यत तयारी केली आहे. कार्तिकी निमित्त भाविकांना 30 नोव्हेंबरपर्यंत विठूरायाचे 24 तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

कार्तिकी वारीत भाविकांच्या सुरक्षेसाठी तब्बल तीन हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पोलिसांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे बंदोबस्त तयार केला आहे. क्यू आर कोड आणि ऑनलाईन सिस्टीम द्वारे पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या बंदोबस्ताचे ठिकाण, सुट्टीच्या वेळा, आपतकालीन यंत्रणेतील सूचना ह्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून एसएमएसच्या माध्यमातून मिळणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑनलाइन बंदोबस्ताची प्रणाली महाराष्ट्र पोलिसांमध्ये प्रथमच यंदाच्या कार्तिकी वारीपासून पंढरपुरात राबवली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्ताचा मार्ग यंदा सुकर हाेणार आहे. दरम्यान कार्तिकी एकादशी दिवशी महापूजेसाठी उपमुख्यमंत्री येतील असा अंदाज असल्याने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे वरिष्ठ पाेलीस अधिका-यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

SCROLL FOR NEXT