Beed Waqf Board Land Scam Saam TV
महाराष्ट्र

वक्फ बोर्डच्या 409 एक्कर जमीन घोटाळा प्रकरणात, तीन आरोपींचं आत्मसमर्पण

बीड शहरातील शहेंनशाहवली दर्गाची 409 एकर 5 गुंठे जमीन, अधिकाऱ्यांशी संगनमत करून, बनावट कागदपत्रे तयार करत भूमाफियांनी लाटली होती.

विनोद जिरे

बीड: बीड जिल्ह्यातील देवस्थान आणि वक्फ बोर्ड जमीन घोटाळा (Waqf Board Land Scam) प्रकरण राज्यात गाजत आहे. तर याविषयी साम टीव्ही प्रत्येक बातमी दाखवत असून याचा पाठपुरावा करत आहे. या प्रकरणात आता काही आरोपींनी हात टेकल्याचं समोर आलंय. बीड शहरातील शहावली दर्गा जमीन घोटाळा प्रकरणातील, 3 आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. शेख आशपाक शेख गौस पाशा 37, रा. राजीवनगर धानोरा रोड बीड, शेख मुजाहिद मुजीब शेख 35 रा .बीड मामला बीड, अजीज उस्मान कुरेशी 47,रा . मोमीनपुरा बीड अशी त्या आरोपींची नावे आहेत.

बीड शहरातील शहेंनशाहवली दर्गाची 409 एकर 5 गुंठे जमीन, अधिकाऱ्यांशी संगनमत करून, बनावट कागदपत्रे तयार करत भूमाफियांनी लाटली होती. तर याच दर्गा हजरत शहशाहवली दर्गाची 10 एकर जमीन राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 लगत सर्व्हे क्र. 22 व 95 मध्ये आहे. याच्या मावेज्यापोटी तब्बल 15 कोटी रुपये शासनदरबारी आले आहेत. तेच हडपण्यासाठी हा गैरव्यवहार, लाचखोरी, मनी लॉडिंग झाल्याचे जिल्हा वक्फ बोर्ड अधिकाऱ्यांनी तक्रारीत म्हटलंय. याप्रकरणी 29 डिसेंबर 2021 रोजी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तत्कालीन बडतर्फ उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव, तत्कालीन तहसीलदार, तत्कालीन मंडळाधिकारी, तलाठी अशा 8 अधिकारी कर्मचाऱ्यांसह व इतर 7 अशा तब्बल 15 जणांवर गुन्हा नोंद झालेला आहे.

दरम्यान साम टीव्ही जिल्ह्यातील जमीन घोटाळ्याची बातमी दाखवत, पाठपुरावा करत असून त्यानंतर आता जिल्ह्यात एक एक कारवाई होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता 3 घोटाळेबाजांनी आत्मसमर्पण केल्यानं तपासाला गती मिळणार आहे. मात्र अद्याप मुख्य आरोपी फरार असल्यानं, या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी देखील बीडकरांमधून होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल

थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

Crime : कानशिलात लगावल्याने बायको भडकली, रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Maharashtra Rain Live News: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील शाळांना उद्या सुट्टी

Woman Police : दारुच्या नशेत रिक्षाचालकाची मग्रुरी, महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT