Myanmar: लष्कराकडून नागरिकांची हत्या, अंदाधुंद गोळीबार, आकाशातून बॉम्बचा वर्षाव

युबँक्स म्हणाले की हे हल्ले अशा ठिकाणी होत आहेत जिथे नागरिकांना वैद्यकीय आणि अन्न मदत दिली जात होती.
Myanmar
MyanmarSaam TV
Published On

युक्रेन विरुद्ध रशिया (Russia vs Ukraine) युद्धाकडे सर्वांच्या नजरा असतानाच दुसरीकडे म्यानमारची सेना (Myanmar Army Attacks) आपल्याचं नागरिकांवर गोळीबार, तसेच हवाई हल्ले करत आहे. त्यामुळे जगात नक्की चाललंय काय असा प्रश्न उभा राहिला आहे. आग्नेय आशियाई देशातील युद्धप्रवण क्षेत्रात सुमारे तीन महिने वास्तव्य करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ही माहिती दिली आहे. फ्री बर्मा रेंजर्स या मानवतावादी मदत संस्थेचे संचालक डेव्हिड युबँक्स म्हणाले की, लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टर पूर्व म्यानमारमधील भागांवर हल्ले करत आहेत.

युबँक्स म्हणाले की हे हल्ले अशा ठिकाणी होत आहेत जिथे नागरिकांना वैद्यकीय आणि अन्न मदत दिली जात होती. जिथे ते आणि त्यांचे स्वयंसेवक थांबले होते अशा ठिकाणी हल्ले होत आहेत. त्यांनी सांगितले की, सैनिकही जमिनीवर अंदाधुंद गोळीबार करत आहेत, त्यामुळे हजारो लोकांनी घरे सोडली आहेत. युबँक म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतरची म्यानमारमधील ही सर्वात वाईट लढाई आहे.

Myanmar
हजारो कोटींची थकबाकी, उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा; वीज तोडणी त्वरीत थांबवणार...

सैन्याने सत्ता काबीज केली

म्यानमारच्या लष्कराने गेल्या वर्षी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या आंग सान स्यू की यांचे सरकार उलथवून सत्ता काबीज केली. म्यानमारच्या अॅलिन डेली वृत्तपत्रात 24 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका वृत्तात, केरेन प्रांताची राजधानी लोईकाव जवळ "दहशतवादी गट" नष्ट करण्यासाठी लष्कराने हवाई हल्ले आणि जोरदार गोळीबार केल्याची कबुली दिली.

देशात हिंसक घटना सुरूच

लष्कराने देश ताब्यात घेतल्यानंतर येथे निदर्शने आणि हिंसक घटना घडत आहेत. देशातील अतिरेकी विरोधी देखील दररोज गनिमी कारवाया करतात, तर लष्कर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहे. यामध्ये हवाई हल्ल्यांचा समावेश होतो, ज्यामुळे लोकांचे मोठे नुकसान होते. म्यानमारमधील ही परिस्थिती पाहता संयुक्त राष्ट्राच्या काही तज्ज्ञांनी याला गृहयुद्ध म्हणून परिभाषित केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com