Ekath Shinde Group Guwahati Tour
Ekath Shinde Group Guwahati Tour Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar : शिंदे गटाच्या आमदाराला ठार मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Ramesh Bornare Got Letter of Threaten : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर- गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना ठार मारण्याच्या धमकीचे पत्र आल आहे. या प्रकरणी बोरनारे यांनी वैजापूर पोलीस स्थानकात तक्रार देत चौकशीची मागणी केली आहे.

आमदार बोरनारे यांच्या वैजापूरमध्ये असलेल्या संपर्क कार्यालयात पोस्टाने एक पत्र मिळाले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून पोस्टाद्वारे अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकावण्याचे पत्र पाठवले आहे. (Latest Marathi News)

त्यात अज्ञात व्यक्तीने बोरनारे यांना ठार मारण्याची सुपारी एकाला दिल्याचे म्हटले आहे. काही लोकांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका महिलेची मदत घेतली असल्याचे निनावी पत्र त्यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी प्राप्त झाले. या घटनेची माहिती वैजापूर पोलीसांना (Police) देण्यात आली असून चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी दिली.

या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. २८ मार्च रोजी एका अनोळखी इसमाने हे पत्र मेश बोरनारे यांच्या संपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवले होते. (Crime News)

हे पत्र गुरूवारी (१३ एप्रिल) रोजी बोरनारे यांच्या कार्यालयात प्राप्त झाले. या पत्राचे तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून तर्कवितर्काना उधाण आले आहे. पोलीसांनी पत्राची दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे. ही धमकी नेमकी कुणी आणि का दिली हे अद्याप समजू शकलेल नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT