Dog Attack on Boy : मोकाट कुत्र्यांचा 8 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला; जखमी बालकावर उपचार सुरु

Parbhani News : मोकाट कुत्र्यांनी आठ वर्षीय बालकाचे लचके तोडुन त्याला गंभीर जखमी केले.
Dog Attack on Boy
Dog Attack on BoySaam Tv
Published On: 

Parbhani Dog Attack News : सोनपेठ शहरात इनामदार कॉलनीमध्ये मोकाट कुत्र्यांनी आठ वर्षीय बालकाचे लचके तोडुन त्याला गंभीर जखमी केले. जखमी बालकाला उपचारासाठी सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून गंभीर असलेल्या बालकाला पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Dog Attack on Boy
Chandrapur Accident News: स्पोर्ट्स बाईकवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, दोन मित्रांचा जागीच मृत्यू

शेख हसनैन शेख अजीज ( वय 8 वर्ष) असे जखमी बालकाचे नाव असून सोनपेठ शहरातील इनामदार कॉलनीत ही घटना घडली. मोकाट कुत्र्यांनी (Dog Attack) केलेल्या हल्ल्यात शेख हसनैन गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या गालावर, होटावर कुत्र्याने चावा घेतल्याने तो गंभीर जखमा झाला आहेत.

परभणी (Parbhani) शहरासह जिल्हात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून पादचारी नागरीक, लहान मुले, महिला यांना बाहेर पडणे मुश्किल झाले असून नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आह़े. (Parbhani News)

Dog Attack on Boy
Mumbai Crime News : उपचारासाठी आणलेल्या आरोपीचा रुग्णालयात धूडगूस, पोलिसांवर हल्ला करत पळाला, पण गेटवरच...

पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला

दरम्यान, पुण्यातील (Pune) आंबेगाव तालुक्यातून देखील अशीच घटना घडली आहे. आईसोबत भाजीमंडईत गेलेल्या चिमुकल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात चिमुकल्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

शुमन किरण गुंजाळ (वय ५ वर्ष) असं जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. कुत्र्याने त्याच्या तोंडावर चावा घेतला असून त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. सुरुवातीला मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. फैजल अब्बासली कुमेरली मीर या मुलालाही पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com