Mumbai Crime News : उपचारासाठी आणलेल्या आरोपीचा रुग्णालयात धूडगूस, पोलिसांवर हल्ला करत पळाला, पण गेटवरच...

आरोपीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना देखरेखीसाठी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना पुढे आली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv

संजय गडदे

Mumbai News : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विलेपार्ले पोलीस ठाणे येथे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना देखरेखीसाठी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना पुढे आली आहे.  (Latest Marathi News)

या हल्ल्यानंतर आरोपी पळून जात असतानाच त्याला गेटवरच पकडण्यात आले. आरोपी विरोधात मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तौफिक ईस्लाम शेख उर्फ ट्राफिक (२८ वर्षे) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Mumbai Crime News
IPL 2023 Betting Crime : आयपीएलवर सट्टा लावणं पडलं महागात; मुंबईतून 8 जणांना अटक, 2 बुकींचा शोध सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले पोलीस (Police) ठाणे येथे कलम ३९२.३४ भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करून अटकेत असलेला आरोपी तौफिक ईस्लाम शेख याला उपचारासाठी विलेपार्ले पश्चिमेकडील कुपर रुग्णालयात (Hospital) 3 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले. आरोपीची सायकॅट्रीक चाचणी करण्यात आली. त्यानंतर एमआरआय चाचणी करण्यासाठी घेऊन जात असताना वेडी हाताला टोचत असल्याचे सांगत लेडीज सेंड करण्याची विनंती केली.

पोलिसांनी हातातील बेडी सैल करताच आरोपीने एक दगड पोलिसांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला.कोई सामने आएगा, तो मै किसको जिंदा नहीं छोडूंगा असे धमकावल्याने इतर रुग्ण, त्याचे नातेवाईक घाबरून पळू लागले. याच संधीचा फायदा घेत आरोपीने देखील पळ काढला मात्र त्याला खूपच रुग्णालयाच्या गेट वरतीच पोलिसांनी (Police) पकडले व त्या विरोधात मुंबईच्या जुहू पोलीस ठाणेस विलेपार्ले पोलीस यांच्या तक्रारीवरून कलम २२४, ३३२, ३५३ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (Mumbai Crime News)

Mumbai Crime News
Pune Rain : पुणेकरांनो! पावसाचे संकट कायम; ३ दिवस पावसाचा अंदाज, येलो अलर्ट जारी

आरोपी विरोधात विलेपार्ले पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे दाखल असल्याने त्याला त्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी असताना माननीय न्यायालयाच्या सूचनेनुसार त्याचा ताबा जुहू पोलिसांनी घेऊन त्याला अटक केली व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com