Junnar news Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांचा पहिला मुक्काम जुन्नरमध्ये, शेतक-यांचा बाजार बंद

Junnar : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना होत असून पहिला मुक्काम जुन्नर येथे आहे. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शेतमालाचा बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत.

Alisha Khedekar

  • मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलनातील पहिला मुक्काम जुन्नरमध्ये होणार.

  • शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला सुरुवात करणार.

  • कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतमाल बाजार बंद ठेवण्याचा आदेश दिला.

  • मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिसांची कडक तयारी.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगे पाटीलांचा लढा आता मुंबईकडे निघणार आहे त्यांच्या या मराठी वादळाचा पहिला मुक्काम जुन्नर शहरात असणार असून मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी अपेक्षित असल्याने शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या मार्गावरील पहिला मुक्काम जुन्नरमध्ये होणार असून, हजारो मराठा बांधव जुन्नर शहरात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमधील वाहतूकीत बदल करण्यात आले आहे.

यावेळी जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहेत. या दरम्यान मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि त्यातून उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खबरदारी घेतली आहे. त्यामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतमालाचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान गणेशोत्सवाच्या तोंडावर २९ तारखेला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनाला गणपती बाप्पा पावणार का, तसेच यावर सरकारची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaishno Devi Landslide: वैष्णो देवी मार्गावर भूस्खलन, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू; जम्मू-कटरा हायवे बंद, २२ ट्रेन रद्द

Water and joint pain: उभं राहून पाणी पिणं गुडघ्यांसाठी खरंच धोकादायक? आहारतज्ज्ञांनी दिली अचूक माहिती

Manoj Jarange : अंतरवाली सराटी आंदोलन प्रकरणात गंभीर गुन्हे मागे घेणार?

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : उत्सव मंडपात दगडूशेठ गणपती बाप्पा दाखल

Nagpur : खेळत असताना खड्ड्याने घेतला चिमुकल्याचा जीव; पाण्यात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT