29 ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनाचा ठाम निर्धार केलेल्या मनोज जरांगेंना उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय...ऐन गणेशोत्सवात मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयानं जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केलीय...
मुंबईत आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने उच्च न्यायालयाने जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मनाई केलीय.मात्र आता खारघर किंवा इतर ठिकाणी आंदोलनास परवानगी देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं, असंही कोर्टानं सुचवलंय.. एवढंच नव्हे तर सार्वजनिक हित आणि कायद्यापेक्षा कुठलंही आंदोलन मोठं नाही, असं सुनावत अॅमी फाऊंडेशनच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने जरांगेंना सुनावलंय..
न्यायालयाच्या निर्णयानंतर गुणरत्न सदावर्तेच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. न्यायालयाने परवानगी नाकारल्याने सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलंय...
आपला न्यायदेवतेवर विश्वास असून न्यायालय आम्हालाही आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी देईल, असा आशावादही जरांगेंनी व्यक्त केलाय..
न्यायालयीन प्रक्रिया सुरु असतानाच सरकारने जरांगेंसोबत वाटाघाटीसाठी चर्चेचं दार उघडलंय.... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला OSD पाठवून जरांगेंना आंदोलन पुढे ढकलण्याची गळ घातली असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदूंच्या सणात अडथळा आणणाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी निःपात केल्याचा दाखला दिलाय.. त्यावरुन तुम्ही मराठ्यांना कापणार का? असा झणझणीत सवाल जरांगेंनी विचारलाय..
कोर्टाने जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी जरांगे आंदोलनावर ठाम आहेत.. त्यामुळे सरकार उद्याचा सूर्य उगवण्याआधी जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढणार की जरांगे आंदोलनासाठी भगवं वादळ घेऊन मुंबईत धडकणार? याकडे राज्याचं लक्ष लागंलय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.