Samruddhi Mahamarg Accidents News माधव सावरगावे
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर आठवडाभरात किती अपघात? समोर आली धडकी भरवणारी आकडेवारी...

Samruddhi Mahamarg Latest News : शिर्डी ते नागपूरपर्यंत आठवडाभरातच ३० अपघात झाले आहेत. त्याशिवाय सहा वन्यप्राण्यांचा जीव गेला आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Maharashtra Samruddhi Mahamarg Accident: राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासूनच अनेक या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. (Samruddhi Mahamarg News)

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर शिर्डी ते नागपूरपर्यंत आठवडाभरातच ३० अपघात झाले आहेत. त्याशिवाय सहा वन्यप्राण्यांचा जीव गेला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर जरा वेग आवरा म्हणण्याची वेळ आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Highway) राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या महामार्गाचे उद्घाटन नुकतेच झाले. उद्घाटनानंतर हा मार्ग सर्वांसाठी खुला झाला आहे. या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवीत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

गेल्या सात दिवसांमध्येच जवळपास ३० वाहनांना अपघात झाला असून, ६५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांना दुखापत झाली आहे, तर दोन ठिकाणी वाहनांना आगदेखील लागली आहे. विविध अपघातात सहा वन्यप्राण्यांचा जीव गेला आहे.

- जालना येथील निधोना इंटरचेंजजवळ ट्रक उलटला

- जालना जिल्ह्यातील सोमठाण्याजवळ कार लोखंडी खांबाला धडकली.

- वाशिममध्ये केनवड येथे गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटला.

- पिप्रीमाळी (जि. बुलढाणा) परिसरात दुभाजकाच्या खड्डयात ट्रक उलटला.

- लग्न वऱ्हाडाच्या कारचा टायर फुटला, धामणगाव (जि. अमरावती).

- औरंगाबाद जिल्ह्यातील घायगाव शिवारात कारने अचानक पेट घेतला.

- सिंदखेडराजा तालुक्यात कार अपघात बालकासह तीनजण जखमी झाले.

- नागपूर जिल्ह्यातील टोलनाक्याजवळच दोन कारचा अपघात झाला. (Breaking Marathi News)

समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचं उल्लंघन करणं पडेल महागात

या महामार्गावर काही वाहन चालक निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवत असल्याचे समोर आले आहे. मात्र आता नियमांचे उल्लंघन करणे वाहन चालकांना महागात पडणार आहे. कारण समृद्धी महामार्गावर ठिक-ठिकाणी पोलिसांचे इंटरसेप्टर (speed interceptor vehicle) वाहन तैनात करण्यात आले असून वाहन मर्यादा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

छोट्या कारसाठी १२० किमी प्रतीतास, मालवाहतुक वाहनांसाठी ८० किमी प्रतितास तर मोठ्या प्रवासी वाहनांसाठी १०० किमी प्रतितास असा वेग निश्चित करण्यात आला आहे. ही वेगमर्यादा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. नागपूर ते शिर्डी प्रवास करताना कारसाठी 900 रुपये टोल आहे. मात्र वेगमर्यांदा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. नागपूर ते शिर्डी या ५४० किमी अंतरात ठिकठिकाणी महामार्ग पोलिसांची इंटरसेप्टपर वाहने तैनात करण्यात आली आहेत. (Samruddhi Mahamarg Speed Limit)

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये -

• लांबी ७०१ किमी • एकूण जमीन : ८३११ हेक्टर • रुंदी : १२० मीटर • इंटरवेज : २४ • अंडरपासेस : ७०० • उड्डाणपूल : ६५ • लहान पूल : २९४ • वे साईड अमॅनेटीझ : ३२ • रेल्वे ओव्हरब्रीज : ८ • द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड) • द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष • कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२ • प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये • एकूण लाभार्थी : २३ हजार ५०० • वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये • कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६ • द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत • ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT