बुलढाण्यात चोरांचा सुळसुळाट; एकाच रात्रीत तीन ATM फोडले !  संजय जाधव
महाराष्ट्र

बुलढाण्यात चोरांचा सुळसुळाट; एकाच रात्रीत तीन ATM फोडले !

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली व खामगाव येथे, चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन कापून रोकड लंपास केली आहे.

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एकाच रात्रीत तीन ठिकाणची एटीएम फोडून लाखो रुपये लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. एटीएम फोडीचा प्रकार लक्षात येताच बँक कर्मचाऱ्यांची एकच धावपळ पाहायला मिळाली.

हे देखील पहा -

चिखली तालुक्यातील शेलुद आणि उंद्री, तर खामगाव तालुक्यातील पळशी येथील स्टेट बैंकेच्या एटीएमला चोरट्यांनी आपला निशाणा करत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून जवळपास 55 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. आधी घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, त्याचबरोबर गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी शाळा फोडून त्यातील कॉम्प्युटर व इतर साहित्याची चोरी केल्याची घटनाही उघडकीस आली होती.

आता चोरट्यांनी आपला मोर्चा बँकांच्या एटीएम कडे वळवला आहे. त्यामुळे आता पोलिसांना कंबर कसून या चोरीच्या घटनांवर आवर घालणे अत्यंत गरजेचे झाले आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याने चोरीच्या घटनांमध्ये एवढ्या प्रमाणात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT