...तर कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे Saam TV
महाराष्ट्र

...तर कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

पोलीस विभागाचा अहवाल आल्यानंतरच आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेबाबत (Department of Health ReExam) निर्णय.

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यातील लसीकरण (Vaccination) राहिलेल्या नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावं. समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर लसीकरण करून घेणं गरजेचं असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नसल्याचं राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, पोलीस विभागाचा अहवाल आल्यानंतरच आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेबाबत (Department of Health ReExam) निर्णय घेतला जाणार असून गृहमंत्र्यांशी याबाबत माझी चर्चा झाली असून लवकर पोलिसांचा अहवाल आल्यास लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची ईच्छा असल्याचही टोपे म्हणाले.

निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून निर्बंध कमी केले जातील मात्र मास्क मुक्ती सध्या नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत बैठक झाली असून साखर आयुक्तालय याबाबत योग्य निर्णय घेईल. पण शेतकऱ्यांनी धीर धरुन सहकार्य करावे. सर्व शेतकऱ्यांची ऊस तोडणी होईल असंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: खासदार मेधा कुलकर्णी इलेक्ट्रिक वाहनाने विधान भवनात दाखल

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

SCROLL FOR NEXT