फ्रिजच्या फ्रीजरमध्ये शिवलिंग प्रकट झाल्याचा दावा
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
स्थानिकांनी बर्फाच्या आकाराला शिवलिंग समजून पूजा-अर्चा केली.
फ्रीजरमध्ये जास्त कुलिंगमुळे तयार झालेला बर्फ असल्याचे स्पष्ट
फ्रिजमध्ये शिवलिंग तयार झाल्याचा व्हायरल दावा खोटा
एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फ्रिजमध्ये शिवलिंग प्रकट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. होय, असा व्हिडिओही व्हायरल करण्यात आलाय. पण, खरंच फ्रीजमध्ये शिवलिंग प्रकट झालंय का.? या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं जाणून घेऊयात.
हा व्हिडिओ पाहा फ्रीजमधील फ्रिजरमध्ये बर्फ जमा झालाय आणि हे शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आलाय. हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर दर्शनासाठी अनेकांनी घरामध्ये गर्दी केलीय. फ्रीज उघडून प्रत्येक जण दर्शन घेतोय. हा व्हिडिओ आल्यावर अनेकांनी शेअर केलाय. स्थानिक लोकांनी याची अमरनाथच्या शिवलिंगासोबत तुलना करत चमत्कार मानत पूजा-अर्चा सुरू केली आहे.
काहींनी तर शिवलिंगासमोर पैसेही ठेवले. हा आस्थेचा विषय असल्याने आम्हीही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. कारण, अनेकजण चमत्कार समजतायत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नीट पाहिला. तसेच हा चमत्कार असल्याचा दावा केल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडूनही याबाबत माहिती मिळवली.
फ्रीजमध्ये शिवलिंग तयार झालं ही आस्था आहे. कोणताही चमत्कार झालेला नाही. फ्रीजरचं जास्त कुलिंग झाल्यामुळे हा बर्फ तयार झाला. तो शिवलिंगासारखा दिसत असल्याने लोकांना वाटलं भोलेनाथ प्रकट झाले. मात्र, अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये. अशी अफवा पसरवल्यास कारवाई होऊ शकते. आमच्या पडताळणीत फ्रीजमध्ये शिवलिंग बनल्याचा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.