महाराष्ट्र

Raigad News : विदारक! मरणानंतरही फरफट, रस्त्याअभावी मृतदेह झोळीतून नेला, कुटुंबीयांची ४ किमी पायपीट

पेण शहरातील रुग्णालयात आदिवासी वाडीवरील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तिचा मृतदेह वाडीवर घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही यामुळे या आदिवासी महिलेचा मृतदेह झोळीत टाकून नेला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम | रायगड: सध्या निवडणूकीमध्ये विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना रायगडमध्ये आदिवासी वाड्या मुलभुत सुविधांपासून वंचित असल्याचे पाहायला मिळाले आहे. वाडीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने मृतदेह झोळीतुन नेला जात असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खवसा आदिवासीवाडी वरील आहे. पेण शहरातील रुग्णालयात आदिवासी वाडीवरील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तिचा मृतदेह वाडीवर घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही यामुळे या आदिवासी महिलेचा मृतदेह झोळीत टाकून नेण्याची वेळ येथील आदिवासी बांधवांवर आली.

खवसा आदिवासी वाडीवर जाण्यासाठी 60 लाख रुपये खर्च करून रस्ता बांधला जात आहे, परंतू आज प्रत्यक्षात रस्ताच नसल्याने मृतदेह झोळीतुन नेण्याची वेळ आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांवर आली आहे. रस्ता बांधण्यासाठी ठेकेदाराला साडेसात कोटी दिले होते आता ते पैसे कोणाच्या खिशात गेले असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. या परिसरातील खवसावाडी, काजुचीवाडी, केळीचीवाडी, तांबडी आणि उंबरमाळवाडी ह्या पाचही आदिवासी वाड्यांना मूलभूत सुविधांची वनवा आहे. आदिवासी बांधव त्याच बरोबर सामाजिक संघटनांमार्फत पाठपुरावा सुरु असून देखील मुलभुत सुविधा मिळत नसल्याने या घटनेनंतर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पेण शहरात खवसा अशी एक छोटी आदिवासी वाडी आहे. या वाडीतील एक महिला खूप आजारी होती. या महिलेचे नाव आंबी कडू असे होते. या महिलेला उपचारासाठी अलिबाग जिल्ह्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, या उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. आंबी कडू या महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पेणपर्यंत आणण्यात आला. परंतू तिथून आदिवासी वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ताच नव्हता. त्यामुळे कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध झाले नाही. अखेरीस ग्रामस्थांनी मृतदेह झोळीत भरुन आदिवासी खवसावाडीत नेला. या वाड्यांच्या रस्त्यांसाठी १ जानेवारी रोजी पुन्हा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने दहा महिने उलटूनही या रस्त्याचे काम सुरू केलेले नाही.

Edited By: Dhanshri Shintre.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT