ऊसतोडणी मजुरांच्या १६ खोपटांवर चोरी; सोने, चांदी, अन्नधान्यही लंपास. वाळवा शिरगाव येथील घटना saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News: ऊसतोडणी मजुरांच्या १६ खोपटांवर चोरी; दागिन्यांसह अन्नधान्य लंपास

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द आष्टा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विजय पाटील

Sangli News :

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या धुमाकूळ घातला. गावाच्या पुर्व बाजूला शेतात असलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या सोळा झोपड्या चोरट्यांनी साफ केल्या. पाेलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी मजूरांच्या खाेपाटवर भेट दिली. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार सुमारे सोळा मजूरांच्या झोपडीतील पत्र्याच्या पेट्या फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले आहे. याबरोबर धान्य, चटणी, मिठ, मुलांचा खाऊ देखील नेला आहे.

ऊस तोडणी मजूर महिलांनी ऊसाचे वाढे विकून साठवलेल्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द आष्टा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

Hug Benefits : पार्टनरला जादूची झप्पी मारा अन् रिलॅक्स व्हा... वाचा फायदे

Palghar : खड्ड्यामुळे बस सेवा बंद; शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

Tandalachi kheer: दसऱ्याला बनवा काहीतरी गोडधोड,तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT