Nashik Latest Marathi News, Nashik News अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

Nashik : शेततळ्यात बुडून २४ वर्षीय अभियंता तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

The unfortunate death of a young Engineer Girl In Nashik : सोनल वडिलांना म्हणाली की, तुम्ही घरी जा, मी थोडावेळ थांबते आणि मग येते.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

सिन्नर, नाशिक: शेततळ्यात बुडून अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या खंबाळे येथे घडली आहे. पाय घसरुन शेततळ्यात पडल्यानंतर (drowned) एका २४ वर्षीय तरुणीचा दुर्देवी अंत (Accidental Death) झाला आहे. सोनल आंधळे (Sonal Andhale) असं मृत तरुणीचं नाव असून तिला पोहता येत नव्हतं, त्यामुळे शेततळ्यात पडल्यानंतपर ती स्वतःला वाचवू शकली नाही. सोनल ही ३ दिवसांपूर्वीच कल्याणहून आपल्या गावी आली होती. (Nashik Latest Marathi News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, खंबाळे येथे भाऊसाहेब किसन आंधळे हे पत्नी मंदाकिनी, मुलगा विशाल आणि मुलगी सोनल यांच्यासह वास्तव्यास असून शेती करतात. त्यांचे गट नं. ४७९ मध्ये शेततळे असून २८ मे ला सकाळी ७ः३० वाजेच्या सुमारास भाऊसाहेब आंधळे आणि मुलगी सोनल हे दोघे शेतावर शेततळ्यात पाणी किती आहे हे पाहण्यासाठी गेले होते. शेततळ्यातील पाणी पाहिल्यानंतर मुलगी सोनल वडिलांना म्हणाली की, तुम्ही घरी जा, मी थोडावेळ थांबते आणि मग येते. असं म्हटल्याने वडिल भाऊसाहेब हे घरी अंघोळ करण्यासाठी निघून आले.

यानंतर अर्धा तास होऊनही मुलगी सोनल घरी न परतल्याने भाऊसाहेब यांनी पुन्हा शेतात जाऊन पाहिले असता ती तेथे दिसली नाही. त्यामुळे भाऊसाहेब यांनी आजूबाजुला शोध घेतला. यावेळी शेततळ्यावर जाऊन पाहिले असता मुलगी सोनल शेततळ्यात बुडाल्याचे (drowned in a Farm Water) दिसून आले.

यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने सोनलला शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. तिला उपचारांसाठी त्वरीत दोडी ग्रामीण रुग्णालायात (dodi government hospital) दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिला मृत घोषित केले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित नोद करण्यात आली आहे. सोनलच्या अचानक जाण्याने आंधळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Season: हिवाळ्यात मध खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Success Story: लंडनमधील कोट्यवधींची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS ऑफिसर दिव्या मित्तल यांची यशोगाथा

Viral Video: बाईक की टेम्पो! दुचाकीवरून ८ जणांचा प्रवास, पोलिसांनी जोडले हात, व्हिडीओ पाहून हैराण व्हाल!

PM Awas Yojana: PM आवाससाठी आता पोर्टलवरून अर्ज! १.८० लाखांची सबसिडी मिळणार, प्रक्रिया आणि कार्यप्रणाली कशी आहे?

Ajit Pawar : ताईंना CM करण्यासाठी अजित पवारांना बदनाम केलं, फडणवीसांचा आरोप, सुप्रिया सुळेंचा पलटवार

SCROLL FOR NEXT