Pune : ४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी सह्याद्री स्कूलसह ४ शिक्षकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

4 school children drown in dam : १९ मे च्या सायंकाळी दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनी अशा चार जणांचा स्कुल प्रशासन आणि शिक्षकांच्या बेजाबदारपणामुळे पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची तक्रार पालकांनी केली होती.
4 school children drown in dam
4 school children drown in damरोहिदास गाडगे
Published On

पुणे: पुणे (pune) जिल्ह्यातील खेड (khed) तालुक्यात १९ मे ला चार शाळकरी मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाला होता. यात 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश होताय. याप्रकरणी आता कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूलसह चार शिक्षकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In the case of death of 4 students drown in chaskaman dam, a case of culpable homicide has been filed against 4 teachers including Sahyadri school pune)

हे देखील पाहा -

देशातील नामवंत असणाऱ्या कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूलच्या (sahyadri school pune) चार विद्यार्थांचा चासकमान धरणाच्या (Chaskaman Dam) पाण्यात बुडुन मृत्यु झाल्यानंतर (4 school children drown in dam) एका पालकाने शाळा प्रशासन आणि शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तमिळनाडू येथील रिथीन डी. डी. या विद्यार्थाचे पालक के. के. धनशेखर यांच्या तक्रारीनंतर राजगुरुनगर पोलीसांत कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूल आणि चार शिक्षकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ मे च्या सायंकाळी दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनी अशा चार जणांचा स्कुल प्रशासन आणि शिक्षकांच्या बेजाबदारपणामुळे पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची तक्रार पालकांनी केली होती.

4 school children drown in dam
लातूरच्या महापौरांना सर्वोत्तम ओबीसी राज्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार २०२२ प्रदान

सह्याद्री स्कुल ही निवासी शाळा डोंगरावर बंदिस्त स्वरुपात आहे. असं असताना शालेय मुले डोंगर उतरुन खाली धरणावर कशी आली? असा प्रश्न उपस्थितीत केला जात होता. आता याबाबत थेट पालकानेच तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात नामवंत शाळा म्हणून ओळख असलेल्या कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुल प्रशासनासह शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याने आता शिक्षण विभाग काय भुमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com