Vardha News Saam TV
महाराष्ट्र

Vardha News: दुचाकी पार्किंगला लावून तो बाजारात गेला, परत आल्यावर झाला मोठा पश्चाताप...

चोरट्यांनी तेवढ्यात डिक्की फोडली आणि त्यातील रोकड तसेच इतर सर्व वस्तू देखील लंपास केल्या.

साम टिव्ही ब्युरो

Vardha News: वर्ध्यामध्ये चोरीच्या घटनांचे प्रमाण फार वाढले आहे. दिवसाढवळ्या कसलीही भीती न बाळगात सराईतपणे चोरटे हातसाफ करत आहेत. काल (बुधवारी) देवळी येथील बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पार्किंगमध्ये ठेवलेल्या व्यापाऱ्याच्या दुचाकीची डिक्की फोडून तीन लाख रुपयांची रोकड चोरीला गेली. चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आता पोलिसांची काही पथके वर्ध्यात विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोहराब रुस्तम तुरक या व्यवसायिकाच्या पैशांची चोरी झाली आहे. सोहराब हे वर्धा येथील रहिवासी आहेत. त्यांचा चुलत भाऊ वसीम पठाण हा देखील एक व्यवसायिक असून देवळी येथे तो धान्य आणि कपाशीचा व्यवसाय करतो. अशात सोहराब यांना देखील व्यवसाय सुरु करायचा होता. यासाठी त्यांनी वसीम यांच्याकडे पैशांची मदत मागितली होती.

त्यामुळे वसीम यांनी वर्धा (Vardha) नागरी बँकेतून ५ लाखांची रोकड काढली. त्यातले तीन लाख त्यांनी सोहराब यांना दिले. हे पैसे त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. पैसे ठेवत असताना चोरट्यांची नजर त्यावर पडली. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सोहराब यांनी दुचाकी उभी केली आणि ते बाजारात काही वस्तू खरेदीसाठी गेले.

त्यांना गेलेलं पाहून चोरट्यांनी तेवढ्यात डिक्की फोडली आणि त्यातील रोकड तसेच इतर सर्व वस्तू देखील लंपास केल्या. यामध्ये सोहराब यांचा एक चष्मा देखील होता. चोरट्यांनी तो चष्मा देखील सोडला नाही. १५ ते २० मिनिटांनी सोहराब परत आले तेव्हा दुचाकीची अवस्था पाहून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच या बाबत पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

SCROLL FOR NEXT