Vardha Crime News: चेहऱ्यावर चाकूने वार करत नागरिकांची लुटमार; सापळा रचत अवघ्या काही तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

त्यानंतर त्याने स्वत: जवळील एक चाकू काढला आणि रोशनच्या चेहऱ्यावर वार केले.
Vardha Crime News
Vardha Crime NewsSaam TV
Published On

Vardha Crime News: वर्धा (Vardha) येथून एक भयभीत करणारी बातमी समोर येत आहे. रस्त्यावर सर्व शांतता असताना एका दुचाकी चालकाची गाडी थांबवत त्याच्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्याला धमकावत त्याच्याकडील सर्व रोख जप्त केले आहे. मात्र पोलिसांनी काही तासांतच या चोरट्याच्या मुसक्या अवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरदगाव बेलसरे येथे काल रात्री ही घटना घडली. यात रोशन सुनिल झोरे या व्यक्तीवर चाकूने वार करण्यात आले. आरोपीचे नाव विशाल असे आहे. रोशन वर्धेकडून देवळीकडे त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी विशालने भरधाव वेगात त्याची दुचाकी आणली आणि रोशनच्या गाडी समोर येऊन थांबवली. त्यानंतर त्याने स्वत: जवळील एक चाकू काढला आणि रोशनच्या चेहऱ्यावर वार केले.

Vardha Crime News
Vardha : 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार वर्ध्यात ; उषा तांबेंची घोषणा

जीव वाचवायचा असेल तर जवळ असलेले सर्व पैसे द्यावे लागतील अशी धमकी त्याला विशालने दिली. ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर कोणीही नव्हते. त्यामुळे ओरडून कुणाची मदत मागण्याचा पर्याय त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे नाईलाजाने त्याने जवळ असलेले ४ हजार रोख रुपये दिले. घाबरलेल्या रोशनने याबाबतची तक्रार सावंगी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी तत्काळ गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीच्या शोधात पथक रवाना केले. सांगवी पोलिसांनी काही तासांतच चोरट्याचा शोध घेत त्याच्यावर कारवाई केली आहे.

Vardha Crime News
Vardha । वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडल्यामुळे अमरावती वर्धा जिल्ह्याचा संपर्क तूटला; पाहा व्हिडिओ

दरम्यान आरोपी विशाल उजवणे संदर्भात पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, त्याने पहिल्यांदाच असा गुन्हा केलेला नाही, या आधी देखील अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com