माहूरमध्ये काँग्रेसला धक्का; शिवसेना राष्ट्रवादीने जवळीकता साधत काँग्रेसला ठेवले सत्तेपासून दूर Saam TV
महाराष्ट्र

माहूरमध्ये काँग्रेसला धक्का; शिवसेना राष्ट्रवादीने जवळीकता साधत काँग्रेसला ठेवले सत्तेपासून दूर

माहूर मध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. नाराज शिवसेनेने राष्ट्रवादीशी जवळीकता साधत कांग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेसने अर्धापूर आणि नायगाव मध्ये एक हाती सत्ता मिळवली मात्र माहूर मध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. नाराज शिवसेनेने राष्ट्रवादीशी जवळीकता साधत कांग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे.

नांदेड जिल्ह्य़ातील अर्धापूर आणि नायगाव नगरपंचतीत कांग्रेसचे एक हाती वर्चस्व असल्याने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली तर माहूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेशी (Shivsena) आघाडी करत नगरपंचायतीवर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं आहे.

माहूर नगरपंचायतीसाठी आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेपासून बाजूला ठेवत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सरफराज दोसानी तर उपनगराध्यक्षपदी नाना लाड हे विजयीझाले. तर नायगाव नगरपंचायतीत 17 पैकी 17 जागा कांग्रेसच्या ताब्यात असल्याने नगराध्यक्षपदी गिता जाधव तर उपनगराध्यक्षपदी विजय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर अर्धापूर वर ही काँग्रेसचा वरचष्मा असल्याने नगराध्यक्षपदी छत्रपती कानोडे तर उपनगराध्यक्षपदी यास्मीन सुलतान यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निवडीची घोषणा होताच ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अर्धापूर आणि नायगाव मध्ये एक हाती सत्ता मिळवली मात्र माहूर मध्ये काँग्रेसचा प्रयोग फसला आहे. काँग्रेसवर नाराज असलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादीशी जवळीकता साधत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT