विरोधीपक्ष नेता शत्रू नसतो; लोकशाहीत संवाद असणे गरजेचे- नवाब मलिक Saam Tv
महाराष्ट्र

विरोधीपक्ष नेता शत्रू नसतो; लोकशाहीत संवाद असणे गरजेचे- नवाब मलिक

विरोधीपक्ष नेता शत्रू नसतो, लोकशाही मध्ये संवाद असणे गरजेचे आहे, मुख्यमंत्री-फडणवीस यांच्या भेटीवर नवाब मालिकांचे सूचक वक्तव्य.

राजेश काटकर

परभणी: विरोधीपक्ष नेता शत्रू नसतो, लोकशाही मध्ये संवाद असणे गरजेचे आहे, मुख्यमंत्री-फडणवीस यांच्या भेटीवर नवाब मालिकांचे सूचक वक्तव्य.आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस दोघेही कोल्हापूर दौऱ्यावरती होते. हा दौरा करत असताना दोघे एकमेकांच्या समोरासमोर आले होते यावेळी त्यांनी एकमेकांशी संवादही साधला.The Leader of the Opposition is not the enemy; There needs to be dialogue in a democracy

याच पार्श्वभूमीवरती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी "विरोधीपक्षनेता हा शत्रू नसतो, लोकशाही सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही घटक महत्वाचे असतात" असं वक्तव्य केलं आहे. तसेच संवादाच्या माध्यमातूनच प्रश्न सोडवायचे असतात, मात्र नरेंद्र मोदीसाहेबNarendra Modi ते मनात नाही, ते कोणासोबत ही संवाद साधत नाहीत, लोकसभेतLokSabha कुठलाही विषयावर ते चर्चा करत नाहीत.

मात्र महाविकास आघाडी सरकारMVA संवाद करण्यावरती विश्वास ठेवते, चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवायचा आमचा प्रयत्न असतो. असही नवाब मलिक म्हणाले त्यांच हे वक्तव्य मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता यांच्या आजच्या चर्चेत असणाऱ्या कोल्हापूर भेटीवरती होते. आज मलिक अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौऱ्या करण्यासाठी परभणीमध्येParabhani आले होते त्यावेळी ते बोलले.

पुरग्रस्तांना पुढील आठवड्यात मदत

दरम्यान, पूर परिस्थिती मध्ये नुकसान झाले आहे. त्या सर्व घटकांच्या बाबतीत पुढील आठवड्यात निर्णय होणार असल्याच मलिकांनी सांगितलं .ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांना 10 हजारांची मदद करणे सुरू आहे , मात्र अतिरिक्त मदत राज्यसरकार पुढच्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचे मालिकांनी यावेळी सांगितले .

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

SCROLL FOR NEXT