vasanta shelke honestly returned 44 thousand to jayswal family 
महाराष्ट्र

चपला शिवणाऱ्याचा प्रामाणिकपणा; जयस्वालांचे ४४ हजार परत केले

संजय जाधव

बुलढाणा : माणुसकी राहिलेली नाही असं वाक्य सतत आपल्या कानावर पडत असतं. परंतु बुलढाणा शहरात चप्पलांचे जाेडे शिवण-या वसंता किसन शेळके याने माणुसकीचे दर्शन तर घडविलेच परंतु त्याला सापडलेले ४४ हजार रुपये परत करुन युवा पिढी समाेर प्रामाणिकपणाचे उदाहरण ठेवले. the-honesty-of-the-one-who-sews-the-slippers-made-the-customer-return-rs-44000-buldhana-positive-news-sml80

मिलिंद नगर येथे राहणारे वसंता शेळके हे गेली अनेक वर्ष भोंडे चौकात चपला, जोडे दुरुस्तीचे काम करतात. या व्यवसायातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालताे. केशव नगर परिसरात राहणारे मुकेश जयस्वाल आणि पूर्वा जयस्वाल यांनी शेळकेकडे बॅग दुरुस्तीसाठी दिल्या हाेत्या. बॅग दुरुस्ती करताना शेळकेला एक पाकीट सापडले.

त्याने पाकीट पाहिले असता त्यात दोन हजार रुपयांच्या नाेटा हाेता. हे पैसे पाहून शेळके चिंतेत पडला कारणा त्याच्याकडे संबंधित ग्राहकाचा संपर्क नव्हता. आपल्याला हे पैसे ग्राहकास द्यायचे आहे असे त्याने काही स्थानिक नागरिकांना कल्पना दिली. नागरिकांनी त्यास बुलढाणा पोलिस ठाण्यात जाऊन माहिती देण्याचे सूचविले. त्यानूसार शेळके याने पोलिस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितली तसेच पैशाचे पाकीट दिले. त्यावेळी पाेलिसांनी शेळकेचे काैतुक करुन आपण ग्राहकास शाेधू या असे सांगितले.

त्यानंतर २ दिवसांनी जयस्वाल दाम्पत्य शेळके याच्याकडे बॅग घेण्यास गेले असता त्याने पैशाचे पाकीट मिळाल्याचे सांगून त्यांना बुलढाणा पाेलिस ठाण्यात नेले. तेथे जयस्वाल दाम्पत्यांस ४४ हजार रुपये ठाणेदार प्रदीप साळुंखे व वसंता शेळके यांच्या हस्ते परत करण्यात आले vasanta shelke honestly returned 44 thousand to jayswal family. यावेळी पैसे परत दिल्याचा आनंद शेळकेच्या चेह-यावरुन आेसांडून वाहत हाेताे. जयस्वाल दाम्पत्य देखील खूष दिसत हाेते. त्यांनी शेळके यास दोन हजार रुपये बक्षीस दिले.

त्यावेळी ठाणेदार प्रदीप साळुंखे म्हणाले शेळकेंनी दाखविलेले प्रामाणिकपणा काैतुकास्पद आहे. यावेळी शेळके याने देखील मला खूप आनंद झाला आहे असे म्हटलं. पण माझ्या कामाचे १२० रुपये मिळाले नसल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT