दुर्लक्षित गडदेवदरी च्या इतिहासाला मिळणार उजाळा  कैलास चौधरी
महाराष्ट्र

दुर्लक्षित गडदेवदरी च्या इतिहासाला मिळणार उजाळा

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गडदेवदरी या धार्मिक स्थळाकडे मात्र पर्यटकांसह पुरातत्व विभागाचे देखील दुर्लक्ष झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सातवाहन काळापासून ते निजामशाही पर्यंतच्या काळात विविध हालचालींचे केंद्र उस्मानाबाद जिल्हा व परिसर राहिल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

तेर, परंडा, नळदुर्ग, तुळजाभवानी मंदिर, रामलिंग, अश्या समृद्ध ऐतिहासिक वारसा स्थळांनी व परंपरांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास देखील समृद्ध केला आहे. उस्मानाबाद मधील या वारसा स्थळांचे व ऐतिहासिक ठेव्याचा संशोधनात्मक अभ्यास देखील झालेला आहे.

हे देखील पहा -

मात्र उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गडदेवदरी या धार्मिक स्थळाकडे मात्र पर्यटकांसह पुरातत्व विभागाचे देखील दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी पर्यटनासाठी येतात मात्र त्याचा इतिहास बहुतांश लोकांपर्यंत पोहचला नाही. आता याबाबतीत अभ्यास करून अपरिचित असलेल्या या ऐतिहासिक व पर्यटन स्थळाच्या इतिहासाचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

इतिहास अभ्यासक धीरज कठारे व सहकाऱ्यांनी या गडाचे संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. गडाच्या बांधकामावरून व पडझड झालेल्या अवशेषावरून हा किल्ला असून त्यामुळे या परिसराला गडदेवदरी या नावाने ओळखले जात असल्याचे बोलले जाते.

तसेच हा गड अठराव्या शतकाच्या अखेरीचा असू शकतो असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या गडाची भौगोलिक रचना पाहता गडाची विभागणी तीन टप्प्यात झाली असल्याचे दिसून येते. सध्या गडावर मोठ्या प्रमाणात झाडे आणि झुडूप तसेच गवताचे प्रमाण वाढले असल्यामुळे जंगली व हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य येथे असल्यामुळे अभ्यासात समस्या निर्माण होत आहेत. मात्र लवकरच या किल्ल्याचे संशोधन पूर्ण करून आणखी एका उपेक्षित दुर्गाचा इतिहास सर्वांसमोर येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT