पुणे : सरहद संस्थेच्या वतीने कारगिल विजय दिवसाला बावीस वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून, कोरोना काळात विशेष काम करणाऱ्या नागरिकांचा गौरव राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
हे देखील पहा -
माळीण मध्ये ज्या पध्दतीने कायमस्वरुपी नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले त्याच पद्धतीचे पुनर्वसन राज्य सरकार तळीये गावात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पश्चिम घाट क्षेत्रातील विकास प्रकल्पांवर बंधने आणणारा डॉ. माधव गाडगीळ समितीचा अहवाल अहवाल राज्यसरकारने का स्वीकारला नाही याबाबत विचारणा केली असता, याबाबत मला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज कुंद्रा प्रकरणाचा तपास व पॅगेसस :
राज कुंद्रा प्रकरणात मुंबई पोलीस योग्य पद्धतीने तपस करत असून येणाऱ्या काळात अश्या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच पॅगेसस वापर करुन राज्यात फोन टॅप करणे किंवा महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवणे अशा घटना समोर येत आहेत तर याबाबतीत विशेष काम सुरू असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले . दरम्यान दिलीप दिलीप वळसे पाटील आंबेगाव परिसरात ज्या ठिकाणी दरडप्रवण क्षेञ आहे त्याची पाहणी करणार आहेत.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.