नंदुरबार जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करुन पहिला क्रमांक पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील आदिवासी पुरुषांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेत कुटुंब नियोजनासाठी जागरुकता दाखवली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात धडगावच्या आदिवासी समाजाचे कौतुक होत आहे.
राज्यात छोटे कुटुंब, सुखी कुटुंब, ही संकल्पना राबवण्यात येत आहे. कुटुंब नियोजनासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात असून प्रत्येक जिल्ह्याला शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. या मोहिमेअंतर्गत एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात एकूण २६३० पुरुष आणि महिलांची नसबंदी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यात पुरुषांची संख्या लक्षणीय असल्याने जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
विशेषतः दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धडगाव तालुक्यात आदिवासी पुरुषांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत नसबंदी शस्त्रक्रिया करुन समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे. आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने केलेल्या जनजागृती मोहिमेचा मोठा प्रभाव दिसून येतो. कुटुंब नियोजनाचे फायदे आणि यामुळे होणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी जागरुकता वाढल्याने अनेक आदिवासी कुटुंबांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.
धडगावसारख्या दुर्गम भागातील आदिवासी समाजात जागरुकता निर्माण होऊ शकते, तर इतर जिल्ह्यांमध्ये का नाही? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. नंदुरबारच्या यशस्वी प्रयत्नांमुळे राज्यभरात कुटुंब नियोजनाविषयी अधिक जागरुकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.