रायगडात पहिली ते चौथीच्या शाळेची घंटा वाजली, तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

रायगडात पहिली ते चौथीच्या शाळेची घंटा वाजली, तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्ह्यामध्ये आज पहिली ते चौथीच्या शाळेची घंटा वाजली आहे. दीड वर्षाने शाळेत विद्यार्थी आल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे या छोट्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट वर्गात सुरू झाला आहे. दीड वर्षाने मुले शाळेत आल्याने शिक्षकांनी त्याचे स्वागत केले आहे. जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या 2108 शाळा असून 1 लाख 82 हजार विद्यार्थी आहेत.

हे देखील पहा-

10 हजार 669 शिक्षक असून साडेतीन हजार शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले नाही. त्यामुळे काही शाळा सुरू झाले नाहीत. मात्र, ज्या शाळा सुरू कारण्यात आले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्यात पाचवी ते बारावी आणि महाविद्यालय सुरू झाली आहे. मात्र, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू होते.

शासनाने या विद्यार्थ्यांना ही शाळा 1 डिसेंबर पासून कोरोना नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 2108 शाळांपैकी काही शाळा आजपासून सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील साडे दहा हजार पैकी सात हजार शिक्षकांचे 2 डोस लसीचे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित साडेतीन हजार शिक्षकांचे 1 डोसही पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे काही भागातील शाळा सुरू झाले नाहीत.

मात्र, इतर भागातील शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी, शिक्षकही आनंदित आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासणी करून मास्क लावूनच वर्गात प्रवेश दिला जात आहे. दीड वर्षाने पुन्हा शाळेत आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत होता. पालकांनीही शाळा सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: केवळ २ हजारांत सुरुवात, आता महिन्याला ६ लाखांची कमाई; ठाण्याच्या 'लाडक्या बहिणी'ची यशोगाथा

Marathi News Live Updates : पुण्यातील मेट्रो, विकासकामांचे Pm मोदींकडून उद्घाटन

Sambhajinagar News : खळबळजनक! बदलापूरमधील 'त्याच' शाळेतील विद्यार्थिनी घर सोडून गेली; थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली

Benefits of Eating Garlic: रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे; वाचून व्हाल थक्क

MP Road Accident: भयंकर! भरधाव बस दगड भरलेल्या डंपरमध्ये घुसली, ९ जण ठार; जेसीबीने पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर

SCROLL FOR NEXT