अमरावतीत तहसीलदारांसमोर दिव्यांग शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न Saam Tv
महाराष्ट्र

अमरावतीत तहसीलदारांसमोर दिव्यांग शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

शेतकरी गेल्या महिनाभरापासून तहसीलदारांकडे रस्त्याच्या मागणीसाठी चकरा मारत होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती : शेतात जाण्यासाठी वहिवाटीच्या रस्त्याच्या प्रकरणात तहसील कार्यालयाकडून (Tehsil Office) न्याय मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने नायब तहसीलदारांच्या कक्षातच तहसीलदारांच्या समोर विष प्रश्न केल्याचा धक्कादायक प्रकार चांदुर बाजार (Chandur Bajar) तहसील कार्यालयात घडला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून तहसील प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. (The disabled farmer tried to commit suicide by drinking poison)

चांदुर बाजार (Chandur Bajar) येथील सचिन वाटाणे (sachin Watane) ( वय ४० ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांची मौजे बेलोरा शेतशिवारात सर्वे क्रमांक १६७/१ मध्ये १० एकर शेती आहे. सचिन जन्मताच ऐका हाताने दिव्यांग आहेत मात्र परिवाराचा गाड़ा हाकन्यासाठी ते शेती करतात त्यांचे शेत सर्वे क्रमांकातील शेती असलेले रमेश शंकरराव सुळे आणि सुरेश शंकरराव सुळे यांनी सचिन वाटाणे यांच्या शेतीत जाण्याचा रस्ता तारेचे कुंपण घालून बंद केला. या प्रकरणाची तक्रार वाटणे यांनी २५ मे रोजी चांदुर बाजाराचे नायब तहसीलदार देवेंद्र सवाई यांच्याकडे केली. तक्रारीचा अहवाल वाटाने यांच्या बाजुने आला तरी मात्र तहसीलदारांनी महिना उलटून गेला तरीही काहीच कारवाई केली नसल्याचं सचिन वाटाणे यांनी सांगितलं.

सध्या पेरणीचे दिवस असल्याने पेरणीसाठी वाटाणे यांना शेतात जाणे आवश्यक असून शेतात रस्ता नसल्याने त्यांची पेरणी खोळंबली आहे. तसेच परिवारावर देखील उपासमारीची वेळ ाली होती त्यामुळे आज सकाळी पुन्हा सचिन वाटाणे आपल्या परिवारासह तहसील कार्यालयात गेले मात्र त्यांना आजही तहसीलदारी उड़वा उडविचे उत्तर दिले त्यामुळे हतबल झालेल्या सचिन ने आपल्यासोबत आणलेले विषारी औषध नायब तहसीलदारांच्या कक्षात त्यांच्या समोरच प्राशन केले. या सर्व प्रकारामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. त्यानंतर वाटाणे यांना तातडीने अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

सचिन वाटाणे हे मागील महिनाभरापासून तहसीलदारांकडे रस्त्याच्या मागणीसाठी चकरा मारत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज वाटाणे यांनी विष प्रश्न करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तातडीने तहसीलदारांनी वाटाणे यांच्या बाजूने रस्त्याची ऑर्डर दिल्याची माहिती आहे.

चांदुर बाजारचे नायब तहसीलदार देवेंद्र सवाई यांनी या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोप वाटाणे यांच्या नातेवाईकांनी केला असून त्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळेच वाटाणे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे तहसीलदारांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्याची तयारी नातेवाईकांनी चालवली आहे.

Amaravati, Tahsildar Office, crippled farmer, commit suicide, drinking poison, Sachin Watane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT