भारताची ऐतिहासिक कामगिरी : लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे

भारतात आतापर्यंत 32,36,63,297 लसींचे डोस देण्यात आहेत.
भारताची ऐतिहासिक कामगिरी :  लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे
भारताची ऐतिहासिक कामगिरी : लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे Twitter/ @ANI

नवी दिल्ली : कोरोना (Corona Virus) लसीकरणाबाबत (Vaccination) भारताने एक ऐतिहीसिक कामगिरी केली आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारताने (India) अमेरिकेलाही टाकले आहे. भारतात आतापर्यंत 32,36,63,297 लसींचे डोस देण्यात आहेत. जे अमेरिकेच्या तुलनेत खुप जास्त आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harsha wardhan) यांनी याबाबत ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच, 'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केलेल्या प्रयत्नांचे उल्लेखनीय परिणाम' असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (India's historic performance: US lags behind in vaccination)

भारताची ऐतिहासिक कामगिरी :  लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे
भारताच्या नकाशाशी ट्विटरचा पुन्हा खेळ

कोविड -19 मधील ताजी प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत आणि गेल्या सात दिवसांत २१ टक्क्यांनी त्यात घट झाली आहे. "संक्रमणामध्ये सातत्याने घट होत आहे! भारतात कोरोनाचा संसर्ग सातत्याने कमी होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत देशात गेल्या 7 दिवसांत 21 टक्के नवीन रुग्णांची घट झाली आहे. हे चांगले लक्षण आहे. परंतु सावध रहा आणि कोविड प्रोटोकॉल अनुसरण करा, अशी सुचनाही यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे.

दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा विनामूल्य पुरवठा करून सहकार्य करत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्यात केंद्र सरकार, देशातील लस उत्पादकांकडून उत्पादित 75% लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य पुरवत आहे.

भारतात 16 जानेवारी 2021 रोजी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाची सुरुवात झाली. तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला 14 डिसेंबर 2020 रोजी प्रारंभ झाला होता. तर आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 43,21,898 सत्रांमध्ये, एकूण 32,36,63,297 लसी देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 17,21,268 लसी देण्यात आल्या. तर नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासात जवळपास, 12,430 रुग्ण बरे झाले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com