शिक्षण विभागाचा युटर्न; शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती Twitter/@ANI
महाराष्ट्र

शिक्षण विभागाचा युटर्न; शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती

गेल्या वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यसरकारने (State Government) काल परिपत्रक जारी करुन शाळा (Schools) सुरु करण्याचा घेतला. यात कोरोनामुक्त ग्रामीण जिल्ह्यात 8वी ते 12वी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज सकाळी पुन्हा शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्य़ात आली आहे. 8वी ते 12वी शाळा सुरु करण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. शाळा सुरु करण्याबाबतच्या निर्णयवर शिक्षक विभागाची घाई-गडबड केल्य़ाचे दिसून आल्यामुळे हा शासन निर्णय स्थगित करण्यात आला आहे. (The Department of Education postponed the decision to start the school)

-काय होता शासन निर्णय

दरम्यान, कोरोनाच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दीड वर्षांपासून शाळा (Schools) बंद आहे. मात्र आता राज्यातील कोरोनामुक्त भागात 8वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गेल्या वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. त्यानंतर आता राज्यातील काही भागातील लॉकडाउन (Lockdown) उठविण्यात आले आहे. तसेच या भागातील शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने १४ जून २०२१ रोजी काढलेल्या पत्रान्वये विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात तर १५ जून २०२१ पासून व विदर्भात २८ जून २०२१ पासून शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत जाहिर केले. या तारखांपासून शिक्षकांनाही शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत व त्यामुळे त्यांच्यावर शारिरीक, मानसिक दुष्परिणाम होत आहे. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग, आकडेवारी व तज्ञांचे मत लक्षात घेता, सध्या १० वर्षापेक्षा कमी वयोगटाच्या मुलांना कोविड संसर्ग होण्याची सर्वात कमी शक्यता आहे. असेही या निर्णयात सांगण्यात आले होते.

त्याच बरोबर, १८ वयापर्यंतच्या मुलांना सध्यातरी संसर्ग होण्याची शक्यता नाही. मात्र शाळा सुरू केल्या नाही तर भविष्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे कठीण जाईल. शाळा बंद व मुलं घरी राहण्याचे अजून जे दुष्परिणाम लक्षात आले आहेत त्यात सामाजिक (socialzation) कौशल्यांचे नुकसान , मोबाईल (mobile)/ इंटरनेटचा (Internet) गैरवापर व games चा addiction , depression , anine शिक्षणापासून वंचित राहणे त्यामुळे मानसिक तणावामुळे काही मुलांनी केलेली आत्महत्या, घरगुती domestic Wolence चे वाढते प्रमाण, बाल - विवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण , मुलींचे घर - शेती कामात ठेवणे आशा अनेक गोष्टींमुळे मोठया प्रमाणावर सामाजिक नुकसान लक्षात आले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविड - मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मात्र, राज्यसरकार शाळा सुरु करण्याबाबत घाई करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द करण्यात आला.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बाईक की टेम्पो! दुचाकीवरून ८ जणांचा प्रवास, पोलिसांनी जोडले हात, व्हिडीओ पाहून हैराण व्हाल!

PM Awas Yojana: PM आवाससाठी आता पोर्टलवरून अर्ज! १.८० लाखांची सबसिडी मिळणार, प्रक्रिया आणि कार्यप्रणाली कशी आहे?

Ajit Pawar : ताईंना CM करण्यासाठी अजित पवारांना बदनाम केलं, फडणवीसांचा आरोप, सुप्रिया सुळेंचा पलटवार

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

SCROLL FOR NEXT