तेल्हाऱ्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय Saam tv
महाराष्ट्र

तेल्हाऱ्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय; तर पाथर्डीचा पूल वाहून गेला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील (Akola) तेल्हारा (Telhara) तालुक्यातील सर्वच रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हिवरखेड तेल्हारा, तेल्हारा पाथर्डी या प्रमुख रस्त्यांची चाळण झाली असून पावसामुळे (rainfall) रस्त्यावर चिखल पसरला आहे. यामुळे वाहन धारकांना (Drivers) मोठी कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील जनता अविकासी लोकप्रतिनिधींना निवडुन देण्याची शिक्षा भोगत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तेल्हाऱ्याला जोडणारा एकही रस्ता आज वाहन चालवण्यायोग्य राहिला नाही. (The condition of the roads in Telhara is deplorable)

रास्तारोको, घंटानाद आंदोलन बऱ्याचदा झाले परंतु तेल्हाऱ्यातील फितुर नेत्यांमुळे लोकप्रतिनिधी संबंधित मतदार संघावर जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. याबाबत जनमत जाणुन घ्यायचे असल्यास तेल्हारा शहराला जोडणाऱ्या चारही रस्त्यांवर ये-जा करणाऱ्याशी दोन शब्द बोलल्यास संबंधित वाटसरु लोकप्रतिनिधींना काय आशिर्वाद देतात यावरुन मतदारसंघ कीती सुरक्षित आणि विकसित आहे, हे लक्षात येते. याबाबत वारंवार माध्यमांनी तेल्हाऱ्याच्या जीवघेण्या रस्त्याला शासन प्रशासन दरबारी पोहचवले परंतु हा रस्ता अनेक बाबींमध्ये अडकुन पडला असल्याच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या माहीत्या समोर आल्या.

तालुक्यात निवडणुकीदरम्यान एका लोकप्रतिनिधीला गावबंदी करण्यात आली होती. त्यामुळे तेल्हाऱ्यातील रस्त्यांबाबत संबंधित लोकप्रतिनीधीने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याची तेल्हाऱ्यातील जनतेत गरमागरम चर्चा आहे. तेल्हारा तालुक्यातील जनतेला निष्क्रिय लोकप्रतिनिधींना निवडुन देण्याची शिक्षा आणखी कीती दिवस मिळणार हे तेल्हाऱ्यातील विकासात्मक विचाराला फितुर नेत्यावरच अवलंबून आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT