देवेंद्र फडणवीस SaamTvNews
महाराष्ट्र

फडणवीसांचं प्रकरण; न्यायालयाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना समन्स!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सत्र न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलंय. त्यानुसार, येत्या ३० ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयामध्ये साक्षीदार म्हणून हजर राहावं लागणार आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सत्र न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलंय. त्यानुसार, येत्या ३० ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयामध्ये साक्षीदार म्हणून हजर राहावं लागणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्ज भरताना दाखल फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवली, असा आरोप करीत ॲड. सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती.

हे देखील पहा :

या प्रकरणी सत्र न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिलाय. त्या आदेशाला फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिलं होतं. त्यावेळी उच्च न्यायालयानं उके यांची तक्रार फेटाळून लावली होती. त्या निर्णयाला उके यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

त्यानंतर सर्वोच्च सत्र न्यायालयात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी सुरू करण्याचे आदेश दिले होते. डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया सुरू करून फडणवीस यांना समन्स बजावलाय. आता या प्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयात साक्षी आणि पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया येत्या ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यानुसार, निवडणूक अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शितल तेजवानी पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती समोर

Tejashri Pradhan: सुंदर अन् सालस तेजश्री प्रधान, फोटो पाहतच राहाल

Face Care: थंडीच्या दिवसात ओठांभोवती काळसरपणा येतोय? या घरगुती स्क्रबने लगेच होईल त्वचा उजळ

Tejaswini Lonari Wedding : "नवरी नी नवऱ्याची स्वारी..."; सरवणकरांचा लेक अडकला लग्न बंधनात; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत आयुष्याची नवीन इनिंग

'तुम्ही भाजपला विकल्या गेले..' अधिकाऱ्याचा मतदान केंद्रावर सावळा गोंधळ; काँग्रेस नेत्या संतापल्या, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT