Buldhana Latest Marathi News, Love affair news in Marathi
Buldhana Latest Marathi News, Love affair news in Marathi Saam TV
महाराष्ट्र

लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे अनैतिक संबंध नवरीला समजले, त्यानंतर....

संजय जाधव

बुलढाणा : लग्न ठरलं, साखरपुडा झाला पण ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं नवरीला पुराव्यानिशी कळालं. त्यामुळे नवरीने या प्रकरणाचा जाब नवरदेवाला फोनवरून विचारला. मात्र, चिडलेल्या नवरदेवाने नवरीच्या घरी जाऊन दंगा केला म्हणून होणाऱ्या सासुबाईंनीच जावयाला तुंरुगात दाखल केल्याची घटना समोर आली आहे. (Buldhana Latest Marathi News)

कोरोनामुळे (Corona) मागील दोन वर्ष कमी प्रमाणात सुरु असलेली लग्न सराई आता मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे. अशातच काही जण फसवी लग्न देखील करत आहेत. मुलीकडच्यांना खोटी माहिती देत लग्न (Marriage) ठरलवलेली लग्न खरी माहिती समोर आल्याने ती मोडल्याची अनेक उदाहरण समोर येत असतात. अशातच आता एका नवरदेवाचे अनैतिक संबंधच होणाऱ्या नवरीला माहित झाल्याची घटना घडली आहे.

अमोल पारेकर असं या नवरदेवाच नावं आहे. अमोलचं एका मुलीसोबत लग्न ठरलं, साखरपुडा झाला पण ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं नवरीला पुराव्यानिशी माहीत पडलं आणि त्यामुळे नवरीने नवरदेवाला जाब विचारण्यासाठी फोन केला. मात्र नवरीने फोनच का केला याचा राग मनात ठेवत अमोल याने नवरीच्या घरी येऊन राडा केल्यामुळे नवरीच्या आईने दिलेल्या फसवणूकीच्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत हळद लावलेल्या नवरदेवाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून अटक केली आहे.

हे देखील पाहा -

अमोल पारेकर अस नवरदेवाच नाव असून तो मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील आहे. सुरत येथे भारतीय रेल्वेत मोटरमन म्हणून नोकरीला आहे. पोलिसांनी अमोल पारेकर सह 10 जणांवर मलकापूर पोलिसात फसवणुकीचे गुन्हे दाखल करीत सर्वाना न्यायालयासमोर उभं केलं असता नवरदेवासह इतरांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीये.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मराठी भाषेला मागच्या १० वर्षांपासून मोदी सरकारने अभिजात दर्जा दिला नाही; जयराम रमेश

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

SCROLL FOR NEXT