आंधळ्या प्रेमात पडली अन् 4 लाखाला फसली; फसवणूक करणारा प्रेमवीर अटक राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

आंधळ्या प्रेमात पडली अन् 4 लाखाला फसली; फसवणूक करणारा प्रेमवीर अटक

लैला मजनू, हिर रांझा या प्रेमी युगलांचे निस्सीम प्रेम आपल्याला माहीत आहे. मात्र आताच्या जगात प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण आणि पैसा या दोन बाबीवर केले जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: लैला मजनू, हिर रांझा या प्रेमी युगलांचे निस्सीम प्रेम आपल्याला माहीत आहे. मात्र आताच्या जगात प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण आणि पैसा या दोन बाबीवर केले जात आहे. त्यामुळे निस्सीम प्रेम करूनही त्यात फसवणुकीची प्रकरणे हल्लीच्या काळात वाढू लागली आहेत. अशीच अलिबागमधील एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धमकी आणि मारहाण करून तिची चार लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत या प्रेयसीला अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली आहे. या फसवणूक करणाऱ्या लव्हर बॉय विरोधात तक्रार दाखल केली असून अलिबाग पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यामुळे या प्रेमी तरुणाला आता जेलची हवा खावी लागली आहे.

अलिबाग शहरातील ठिकरूळ नाका येथे राहणाऱ्या आदित्य या तरुणाचे गोविंद बंदर येथील कॉलेजच्या तरुणीवर प्रेम जडले. तरुणीही त्याच्या प्रेमात रंगून गेली. प्रेमासाठी वाट्टेल ते या उक्तीप्रमाणे ही तरुणी आदित्याच्या बोलण्यावर, वागण्यावर भाळली. लग्न करून कुटूंबाच्या सुखी संसाराची स्वप्न ती आदित्य बरोबर पाहू लागली. 2018 पासून हे प्रेमी युगल एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र आदित्य हा मात्र त्या तरुणीच्या निस्सीम प्रेमाची कदर न करता तिच्या पैशावर डोळा ठेवून होता. आदित्य याने त्या तरुणीचा पूर्ण विश्वास संपादन केला होता. प्रेमाच्या आणाभाका देऊन आदित्य हा तरुणीला वेळोवेळी वेगवेगळी कारणे देऊन भेटायला बोलवायचा आणि तिच्याकडून पैसे उकळायचा तिला मारहाण करायचा. फसलेली तरुणी ही वडिलांनी काढलेल्या कर्जाचे पैसे चोरून प्रियकराला देत होती. एवढंच नव्हे तर आईच मंगळसूत्र, कानातील डुल हे सुद्धा प्रेमात आंधळी होऊन दिले. घरातून पैसे गायब होत असल्याचे कळल्यावर पालकांनी तिच्यावर पाळत ठेवली. मात्र तोपर्यत 4 लाख रुपयाला ती तरुणी फसली होती.

आदित्यने या तरुणीच्या आंधळ्या प्रेमाचा सहारा घेऊन त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा 3 लाख 94 हजार 800 रुपयांचा ऐवज काढून घेतला. वर आदित्यने तुझ्या छोट्या भावाला ठार मारण्याची धमकीही दिली. आदित्यने तिच्या पैशातून एटीव्ही बाईक, स्कुटर, आय फोन, मित्रासाठी पार्टी यावर पैसे उडविले. तर आईचे चोरून आणलेले दागिने उरण येथील एका सोनाराला विकून पैसे घेतले. प्रेमाच्या नावाखाली आदित्यने आपली फसवणूक करून पैसे उकळले हे लक्षात आल्यावर त्या तरुणीने आणि पालकांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठले. आदित्य विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आदित्य याला अटक केली असून मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक शैलेश सणस करीत आहेत. मात्र या प्रकरणावरून प्रेमाची परिभाषा ही काळानुरूप बदलत चालली आहे हे मात्र नक्की. पालकांनीही वयात आलेल्या आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे आवाहन पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT