Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola News: अकोला हादरलं! हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळला २० वर्षीय तरुणीचा मृतदेह

Akola Marathi News: या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Shivani Tichkule

Akola Crime News: अकोल्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता अकोल्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोला जिल्हातल्या पातुर परिसरात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

ह्या मृतक तरुणीचे हातपाय बांधलेल्या परिस्थितीत असल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर या तरुणीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पातूर येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालया जवळील शेत शिवारात जाणाऱ्या पांदण रस्त्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात बेवारस स्थितीत मृतदेह येथील गावकऱ्यांना दिसला. (Crime News)

त्यानंतर गावाकऱ्यांना याची माहिती तात्काळ पातुर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता येथे हातपाय बांधलेल्या अवस्थेत २० वर्षीय तरुणीचा मृददेह आढळून आला. घटनास्थळी पातूर पोलीस ठसे तज्ञ फॉरेनसिक लॅब चे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. (Akola News)

सदर युवतीचे हातपाय बंधून असल्याने या युवतीचा घतपात झाला असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून नेमकी ही युवती कोण? या युवतीचा घातपात झाला की अजून काही? याचा तपास पोलीस लावत असून तपासा अंतीच सर्व निष्कर्ष बाहेर निघेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

SCROLL FOR NEXT