OBC आरक्षणासंदर्भात 'भाजपा' फक्त राजकारण करत आहे; रोहीत पवारांचा आरोप SaamTV
महाराष्ट्र

OBC आरक्षणासंदर्भात 'भाजपा' फक्त राजकारण करत आहे; रोहीत पवारांचा आरोप

केंद्राने इम्पेरिकल डेटा दिला तर राजकीय आरक्षण लगेच देता येईल.

विहंग ठाकूर

दिल्ली : ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC reservation) भारतीय जनता पार्टी (BJP) केवळ राजकारण करत आहे, केंद्र, सरकारने इम्पिरिकल डेटा (Imperial data) द्यावा जर केंद्राने इम्पेरिकल डेटा दिला तर राजकीय आरक्षण लगेच देता येईल. मात्र त्यावरती भाजप काही बोलत नाही. 105 वी घटना दूरुस्तीनुसार अधिकार दिले पण 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यावर निर्णय झालेला नाही. याबाबतीत संसदेत भाजपचा एकाही खासदाराने मुद्दा मांडला नाही. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केलं आहे.(The BJP is only doing politics regarding OBC reservation)

हे देखील पहा-

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यापासून राज्यात या आरक्षणाच्या मुद्यावरुन मोठ्या प्रमाणात राजकारण (Political) तापलं आहे .एकीकडे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणाचा (Political Reservation) मुद्दा जो पर्यंत निकाली लागणार नाही तो पर्यंत आपण निवडणूका घेणार नाही. असा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोना संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकीसाठी लागू होत नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्यामुळे निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका (Elections) घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्यामुळे या निवडणूका 5 ऑक्टोंबरला होणार आहेत आणि यावरुणच महाविकास आघाडी सरकारला (MVA Goverment) भाजपने धारेवर धरलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वेळखाऊपणामुळे हे ओबीसी आरक्षण गेलं असल्याचा आरोप बाजपकडून सतत करण्यात येत आहे आणि याच आरोपांवरती बोलताना रोहीत पवारांनी भाजपवरती निशाना साधला आहे. जर केंद्राने इम्पेरिकल डेटा दिला तर राजकीय आरक्षण लगेच देता येईल. पण त्यावरती भाजप काही बोलत नाही भाजपचे नेते केवळ राजकारण करत असल्याचही रोहीत पवार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

SCROLL FOR NEXT