Jalna News
Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News : फरार आरोपीला तमाशाचा मोह पडला महागात; पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

लक्ष्मण सोळुंके

जालना - १४ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणातील पोलीस कोठडीत असलेला राजू माळी हा संशयित आरोपी नऊ दिवसांपूर्वी हसनाबाद पोलीस (Police) ठाण्याच्या कोठडीतून जेवणाची पत्रावल फेकण्याचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. त्यांच्या शोधत पोलिसांनी जंग पछाडत शोध ही सुरू केला.आरोपीला तमाशा पहाण्याचा मोह काही आवरता आला नाही आणि पुन्हा तो पोलीस ताब्यात आला.

हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थिगळखेडा गावातील नातेवाईकाच्या १४ वर्षाच्या मुलीसोबत ओळख दाखवत राजू शेषराव माळी या ऊसतोड मुक्कादम असलेल्या संशयित आरोपीने बलात्कार केल्या नंतर हसनाबद पोलिसांनी त्याला अटक केली. ११ नोव्हेंबर ला न्यायालयाने त्यांची अधिक तपासासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.

कोठडीत असताना रात्री नऊच्या सुमारास जेवण केल्या नंतर आरोपीने पत्रावळ बाहेर फेकण्याच्या बहाण्याने अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली. आरोपी ठाण्याच्या कोठडीतून पसार झाल्याने पोलिस दलात एकच खबळ उडाली.पोलिसांनी जंग पछाडत शोध ही सुरू केला मात्र गेल्या नऊ दिवसापासून आरोपी सापडत नसल्याने पोलिसांची झोप उडाली होती.

अखेर काल भोकरदन तालुक्यातील नळणी गावात गेल्या आठवड्या पासून सुरू असलेल्या यात्रेत तमाशाचे फड सुरू असल्याने राजू शेषराव माळी या आरोपीला तमाशा पाहण्याचा मोह आवरता आला नाही.त्यांनी तमाशाचा फड गाठत मोज मस्ती करत गाणी ही आयकली अन भूक लागली म्हणून अंडा आम्लेट च्या गाड्यावर आम्लेट खाताना त्यांनी तोंडाचा रुमाल सोडला.

संशयित आरोपी लक्षात येताच पोलीस मित्रांनी त्यांच्यावर पळत ठेवत याची माहिती भोकरदन पोलिसांना दिली. भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड,आणि हसनाबद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी तमाशा फड गाठत त्याला बेड्या ठोकत अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी आत्महत्या प्रकरण, हायकोर्टात याचिका

Oily Skin Tips : ऑयली स्किनपासून २ मिनिटांत सुटका; अप्लाय करा 'हे' खास लोशन

Ajit Pawar: दहा वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही आरोप झाला नाही: अजित पवार

Mobile Hack: फोन पाण्यात पडला तर, चुकूनही करु नका हे काम,नाहीतर होईल नुकसान

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT