Jitendra Awhad Latest News: कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यात तणावाचं वातावरण आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजप आणि मनसेने तीव्र निषेध केला आहे. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती, असं राहुल गांधी म्हणाले होते.
याबाबत एका हिंदी वृत्तवाहिनीने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपच्या एका प्रवक्त्याने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती, असा दावा भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Sudhanshu Trivedi Vs Jitendra Awhad)
भारतीय जनता पार्टीचे (BJP) खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबला पत्र लिहिलं होतं. त्या काळात राजकीय अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक लोकं माफीनामा लिहायचे असं विधान त्रिवेदी यांनी केलं आहे, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा हा व्हिडीओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं बोलणारा भाजपा प्रवक्ता वेडाच असू शकतो."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.