ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा तुमच्याकडून चुकून तुमचा फोन पाण्यात पडतो.
पाण्यात पडल्यामुळे फोन खराब होण्याची शक्यता असते.
त्यामुळे फोन जेव्हा पाण्यात पडल्यामुळे भिजला असल्यास या चुका करणे टाळावे.
फोन सुकवण्यासाठी कधीही हेअर ड्रायरचा वापर करु नये. त्यामुळे फोनचे हार्डवेअर खराब होण्याची शक्यता असते.
कधीही फोन पाण्याने भिजल्यानंतर तो सुकवण्यासाठी कोणत्याही गरम सरफेसवर ठेवू नये.
तुमचा फोन पाण्याने भिजल्यानंतर चुकूनही चार्जिंगला लावू नये.
अनेकजण त्यांचा फोन पाण्यात पडल्यानंतर तांदळात ठेवतात मात्र कधीही फोन तांदळात ठेवू नये.त्यामुळे फोनचा स्पीकर खराब होण्याची शक्यता असते.
फोन पाण्यात पडल्यानंतर तो एका कॉटनच्या कापडाने पुसावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.