Thane Water Supply Saam tv
महाराष्ट्र

Thane Water Crisis : ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी! ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठे?

Thane Water Supply : ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे?

विकास काटे, ठाणे

ठाणे : ठाण्यातील काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामकाजामुळे मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाणेकरांना ऐन पावसाळ्यातच मंगळवारी पाणी जपून वापरावे लागणार आहे. पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पालिकेने पाण्याचे नियोजन करून ठेवण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे आणि इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी २४ तासांचा शटडाऊन घेऊन करण्यात येणार आहे.

दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे महापालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी दिनांक 22/07/2025 रोजी सकाळी 9.00 ते बुधवार दिनांक 23/07/2025 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

या कामामुळे घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील. तर समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राच्या काही भागात मंगळवारी रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहील. अशा रितीने टप्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे.

मु्ंबईत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गुरुवारी फुटल्याची घटना घडली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. विलेपार्ले पश्चिमेकडील नानावटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच पिण्याच्या पाण्याची लाईन फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी पसरले. विलेपार्ले परिसरात नागरिकांना पिण्याचे पाण्याचा अपुरा पुरवठा होणार आहे. महापालिकेच्या के पश्चिम प्रभागाचे जलविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर पोहोचून दुरुस्तीचे काम सुरू केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT