Thane Water Supply Saam tv
महाराष्ट्र

Thane Water Supply : ठाणेकरांसाठी मोठी बातमी! पाणीपुरवठा २४ तास राहणार बंद; बारवी जलशुद्धीकरण केंद्राची जलवाहिनी फुटली

Thane News : उल्हास नदीतून पाणी उपसा करून आणला जातो आणि जलशुद्धीकरण करून ते पाणी अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, आनंदनगर एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी या भागाला पुरवलं जातं

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये उल्हास नदीतून एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटली आहे. यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे. सदर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र पुढील २४ तास एमआयडीसीकडून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी ठाणे जिल्ह्यावासीयांना दोन दिवस पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. 

अंबरनाथच्या जांभूळ गावात एमआयडीसीचे बारवी जलशुद्धीकरण केंद्र आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात उल्हास नदीतून पाणी उपसा करून आणला जातो आणि जलशुद्धीकरण करून ते पाणी अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, आनंदनगर एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी या भागाला पुरवलं जातं. अर्थात उल्हास नदीतून या शहरांना मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येत असतो. 

दुरुस्तीला लागणार २४ तास 

दरम्यान नदीतून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणारी पाईपलाईन ४० वर्ष जुनी आहे. हीच जलवाहिनी फुटल्याने जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाईपलाईन फुटल्याने यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली होती. हि गळती थांबविण्यासाठी पाईप लाईन दुरुस्तीचे काम लागलीच हाती घेण्यात आले आहे. तरी देखील या जलवाहिनीच्या दुरुस्तीला २४ तासांचा कालावधी लागणार आहे. 

या भागात पाणीपुरवठा बंद 

तर दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्र, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, आनंदनगर एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी या संपूर्ण भागाचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. परिणामी नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांना देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT